गोवरी पूरग्रस्तांना वेकोली मदत आणि पूरग्रस्त शेतीचे अधिग्रहण करणार - खासदार बाळुभाऊ धानोरकर

 

गोवरी पूरग्रस्तांना वेकोली मदत आणि पूरग्रस्त शेतीचे अधिग्रहण करणार - खासदार बाळुभाऊ धानोरकर

गोवरी पूरग्रस्तांना कोल्हापूर पूरग्रस्तांप्रमाणे शासकीय मदत मिळणार - आमदार सुभाष धोटे

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : राजुरा तालुक्यातील दिनांक २२ व २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या पावसामुळे गोवारी परिसरात निर्माण झालेल्या पुरपरिस्थीचा आडावा लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला. वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या चुकीच्या नियोजनामुळे गोवारी आणि परिसरातील गोरगरीब जनतेचे फार मोठे नुकसान झाले, या मध्ये १७२ घरे पाण्याखाली आले आणि अनेक लघु उद्योगाला फटका बसला आहे. अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

            या प्रसंगी लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, लघुउद्योग, आणि घरांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात याव्यात तसेच या पुढे मातीच्या ढिगार्याचे योग्य नियोजन वेकोलीने करावे अशा सुचना वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या अधिकाऱ्यांना केल्या. या प्रसंगी गावकऱ्यांना त्यांनी आस्वस्थ केले की सर्व पूरग्रस्तांना वेकोली योग्य ती मदत आणि पूरग्रस्त शेतीचे भूसंपादन करणार. तर लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, गोवरी परिसरातील प्रत्येक पूरग्रस्तांना राज्य सरकार कोल्हापूर पूरग्रस्तांप्रमाणे सर्व आवश्यक नुकसान भरपाई करणार. यासाठी आपण सर्व आवश्यक पाठपुरावा करणार आहे. तर वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा सोडून अशा प्रकारचे नुकसान यापुढे होणार नाही आणि स्थानिक नागरिकांना पुढे असा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशा सुचना केल्या. 

     या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सरपंच आशा उरकुडे, उपसरपंच उमेश मिलमीले, उमाकांत धांडे, नंदु वाढई, हरिचंद्र जूनघरे, बबन उरकुडे, शिवराम लांडे, मधू सोयाम, विठ्ठल पाचभाई, बबन लांडे, देविदास ठेंगणे, आकाश नांदेकर, निलम कोसुरकर, रेखाताई पाचभाई, निलिमा देवाळकर, भिमराव मिट्टूवार, चेतन बोभाटे, अमोल कोसुरकर, सुरेखा सोयाम, अमोल घटे, राजु पिंपळशेंडे, लहु चहारे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक डे ,  प्रबंधक जी पुल्लया, तहसीलदार हरिष गाडे, उपविभागीय कृषि अधिकारी पवार, तालुका कृषी अधिकारी मकपल्ले, आर एफ ओ विदेशकुमार गलगट, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यासह गोवारी येथील नगारिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.





Post a Comment

0 Comments