अभाविप गडचांदूर शाखे तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

 



अभाविप गडचांदूर शाखे तर्फे  रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

गडचंदुर  ( राज्य रिपोर्टर ) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशातील नव्हे तर जगातील  सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाते. विविध आंदोलन, शिबीर, व सामाजिक उपक्रम  अभाविप नेहमी करत असते. त्यांचा एक भाग म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम गडचांदुर शाखेतर्फे पहिल्यांदा राबविण्यात आला. बहीण - भावाचं नातं जोपासणारा सण साजरा करत असतो. तो सण म्हणजे रक्षाबंधन चा कार्यक्रम रक्षा - सूत्र माध्यमातून अभाविपच्या कार्यकर्त्या अहोरात्र देशासाठी कार्य करण्याऱ्या अभाविपच्या माध्यमातून पोलीस स्टेशन गडचंदुर या ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला व  सर्वं पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांना ला ओवाळून  राख्या बांधण्यात आल्या व सर्वांना मिठाईचे वाटप करून रक्षाबंधनच्या शुभेच्छा देण्यात आल्या अश्या प्रकारे आपुलकीची भावना व्यक्त करत अभाविप च्या विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. या वेळी पोलीस बांधवा सोबत काही विषयावर चर्चा करण्यात आली. कोरोना चे सर्व नियम पार पाडत.  मास्कचा, आणि  सॅनिटायझर वापर करून हे  कार्यक्रम यशस्वी पणे व  उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नगर मंत्री अमित पांडे, सह मंत्री प्रदीप तिवारी, अविनाश बागडे, रवींद्र वर्मा, ऋतिक लीपटे,  देवा शेट्टी, अंकिता शेरे, निशा रुडे, सूरज लोडे हे विद्यार्थी स्थानिक नागरिक उपस्थित होते.









Post a Comment

0 Comments