बल्लारशाह वनपरिक्षेत्रात अवैधरित्या मुरूम उत्खनन प्रकरणे ट्रॅक्टर सहित चार मजूर यांच्यावर व गुन्हा नोंद

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात अवैधरित्या मुरूम उत्खनन प्रकरणे ट्रॅक्टर सहित चार मजूर यांच्यावर व गुन्हा नोंद

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारशाह वनपरिक्षेत्रात अंतर्गत नियतक्षेत्र कळमना मध्ये कक्ष क्र. 572 ( संरक्षित वन ) मध्ये कळमना क्षेत्र सहायक व वनरक्षक गस्त करीत असताना अवैधरित्या मुरूम खोदकाम  करून वाहतूक करतांना दिसले असता नामे  तुळशीराम लक्ष्मण घोडाम रा. बामनी यांच्या मालकीचे  स्वराज ट्रॅक्टर क्र. MH 34 BF 9422 व ट्रॉली जप्तीची कार्यवाही करून प्राथमिक गुन्हा क्र. 08945/223603 दि. 16/08/2021 नुसार ट्रॅक्टर मालक तसेच नागेश रवींद्र पेंदोर राहणार कळमना ट्रॅक्टर चालक व इतर चार मजूर यांच्यावर व गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह श्री. संतोष थिपे यांचे मार्गदर्शनात श्री. भागीरथ पुरी, क्षेत्र सहायक कळमना , कु. एल. आर. प्रगतीवार वनरक्षक कळमना करीत आहे.







Post a Comment

0 Comments