जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित पदी जिल्ह्यातील खासदार व आमदार सहित अनेक मान्यवरांची नियुक्ती

 

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित पदी जिल्ह्यातील खासदार व आमदार सहित अनेक मान्यवरांची नियुक्ती

🔹विशेष ज्ञान असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून 11 सदस्यांची निवड करण्यात आली. 

🔹बल्लारपुरचे  श्री. घनश्याम खुशीमल मुलंचंदानी  यांची निवड करण्यात आली.


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीची रचना व नियमन अधिनियमन कलम 30/2000 तील विविध कलमानुसार विधिमंडळ सदस्य/संसद सदस्यांमधून 2 व्यक्तीची 'नामनिर्देशित सदस्य ' व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील वास्तव्यास असलेल्या 11 व्यक्तींची " विशेष निमंत्रित " म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या संदर्भात मा.जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांनी उपरोक्त आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावेत.

      यानुसार विधिमंडळ व संसद सदस्यामधून नामनिर्देशित सदस्य म्हणून  श्री. सुरेश नारायण धानोरकर, संसद सदस्य, आ. श्री. सुभाष रामचंद्र धोटे, विधानसभा सदस्य  यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रा.राजेश मारोतराव कांबळे रा.ब्रम्हपुरी, राजेंद्र गुणवंतराव वैद्य, समाधी वार्ड चंद्रपूर, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          जिल्हा नियोजनाचा विशेष ज्ञान असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे यानुसार 1) श्री.संदीप नारायण गड्डमवार रा.सावली, जि. चंद्रपूर, 2) श्री. गजानन तुकाराम बुटके रा.चिमूर जि. चंद्रपूर, 3) श्री. घनश्याम खुशीमल मुलंचंदानी, किल्ला वॉर्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर, 4) श्री. दादाजी पांडुरंग लांडे, रा.राजुरा जि. चंद्रपूर, 5) श्री. प्रकाश देवतळे, रा.चंद्रपूर, 6) श्री. अजय रामभाऊ वैरागडे, रा.चंद्रपूर, 7) श्री.संदीप अनिलराव गिरे, जि. चंद्रपूर, 8) श्री. नरेंद्र महादेव पंढाळ, रा.भद्रावती जि. चंद्रपूर, 9) श्री. भोजराज उपासराव रा.नागभीड जि. चंद्रपूर, 10) श्री. मोरेश्वर टेमुर्डे, रा.अंबादेवी वॉर्ड वरोरा जि. चंद्रपूर, 11) श्री.अरुण केशवराव निमजे रा.गडचांदूर त.कोरपना जि. चंद्रपूर इ ची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे.















Post a Comment

0 Comments