शंभर टक्के समाजकारण करुन राजकारण करावे : डॉ. अशोक जिवतोडे

 

शंभर टक्के समाजकारण करुन राजकारण करावे : डॉ. अशोक जिवतोडे 

🔸राष्ट्रवादी पदवीधर संघाद्वारे पदाधिकारी संवाद व संघटनात्मक आढावा कार्यक्रम संपन्न

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : राजकारण करीत असतांना शंभर टक्के समाजकारणच केले पाहिजे. तेव्हा कुठे राजकारणाचा फायदा हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. समाजातील प्रत्येक समस्येत राजकारण आणल्याने अनेक समस्या सुटु शकल्या नाहीत. पदविधर हा बुध्दिजिवी वर्ग आहे. या वर्गाची उर्जा वाया जावू नये, ती चळवळीच्या व सामाजिक कार्याच्या मार्गी लागावी, असे विचार ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी येथे आयोजित राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या संवाद कार्यक्रमात मांडले.

  राष्ट्रवादी पदवीधर संघ, महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा चंद्रपूर च्या वतीने पदाधिकारी संवाद व संघटनात्मक आढावा बैठक आज ( दि.१७ ) ला जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्री.लीला सभागृहात पार पडली.

 या बैठकीत विधानपरीषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष सौ. बेबीताई उईके, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे चंद्रपुर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक पोफळे, किसान सेलचे अध्यक्ष जुनघरी, उद्योग आणी व्यापार सेलचे अध्यक्ष चंद्रकांत अग्रवाल, विजुक्टाचे जिल्हाअध्यक्ष प्रा. राजेंद्र खाडे आदी उपस्थित होते. 

  कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. रवि वरारकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदवीधर उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments