चंद्रपूर शहर मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून बांधली वाहतूक पोलिसांना राखी
महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वाहतूक पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
बहीणभावाच्या मनातील प्रेम भावना जपणारा हा राखी पौर्णिमेचा उत्सव आहे. कोरोना काळात आपण जे कार्य करत आहेत, त्याची परतफेड करता येणार नाही, परंतु या बहिणींच्या रक्षाबंधनाने आपले कर्तव्य बजाविण्यात नक्कीच अधिक बळ मिळेल, म्हणून मनपा महिला व बालकल्याण समितीने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
0 Comments