बल्लारपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. राजीव गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

बल्लारपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. राजीव गांधी जयंतीनिमित्त अभिवादन 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : भारताचे माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यानिमित्ताने देशभरात अनेक ठिकाणी २० ऑगस्टला   स्व.राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले या निमित्ताने दिल्लीतील स्व.राजीव गांधी यांच्या समाधी स्थळ ( विरभूमी ) या ठिकाणी आज सकाळी सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका वढेरा यांनी पुष्पचक्र अर्पण केले देशभरात राजीव गांधी यांची आठवण करीत असताना बल्लारपूर शहरातही काँग्रेस भवनात बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाचे माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले यानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी बल्लारपूर चे  शहर अध्यक्ष अब्दुल करीम भाई, घनश्याम मूलचंदानी, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य, अनिल खरतड, इस्माईल ढाकवाला, एड.मेघा भाले यांच्या सह काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.








Post a Comment

0 Comments