गंभीर अपघातात वाचला वृद्धाचा जीव, बल्लारपूरात विचित्र अपघात सीसीटीव्ही मध्ये चित्रित

  

गंभीर अपघातात वाचला वृद्धाचा जीव,

 बल्लारपूरात विचित्र अपघात सीसीटीव्ही मध्ये चित्रित

 कलाकेंद्र स्टुडियोच्या सीसीटीव्ही मध्ये सदर अपघात चित्रित

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक विचित्र प्रकारचा अपघात घडला आहे बल्लारपूर-आल्लापल्ली मार्गावरील कलाकेंद्र स्टुडियोच्या सीसीटीव्ही मध्ये सदर अपघात चित्रित झाला आहे अशी म्हण आहे की " मारणाऱ्या पेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो" अशाच प्रकारची घटना बल्लारपूर शहरात घडली एका वृद्ध व्यक्तीला धडक देऊन त्याच्या अंगावरून धडक बसून ही तो वृद्ध जिवंत आहे. मात्र या अपघातात तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.

             या संबंधीच्या अधिक माहितीनुसार २३ ऑगस्ट २०२१ ला सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास बल्लारपूर येथील फुलसिंग नाईक वार्ड येथील निवासी असलेले शंकर मल्लाराम, वय-७० हे रुग्णालयात जाण्यासाठी घरून निघाले असता रस्त्याच्या बाजूला एक ट्रक उभा होता रस्ता पार करीत असताना अचानक ट्रक सुरू झाला व ट्रक ने त्या वृद्ध व्यक्तीस धडक दिली वृद्ध त्या ट्रकच्या अगदी समोर असल्याने ट्रक चालकाला दिसले नसावे त्यामुळे ट्रकने धडक देऊन पुढे निघाला मात्र या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला सुदैवाने त्याचा जीव वाचला. सदर मार्ग रहदारीचा असल्याने तिथे उपस्थित नागरिकांनी सदर वृद्धाला रुग्णालयात दाखल केले व या अपघाताची माहिती बल्लारपूर पोलीस स्टेशनला दिली असता बल्लारपूर पोलीस ट्रक चालक व ट्रक चा शोध घेत असल्याची माहिती आहे.






Post a Comment

0 Comments