रोजगार निर्मितीचे केंद्र असलेल्या सिएसटिपीएसच्या मुखा समोरील भागांमधील बेरोजगारी म्हणजे दुर्देव - आ. किशोर जोरगेवार

 

रोजगार निर्मितीचे केंद्र असलेल्या सिएसटिपीएसच्या मुखा समोरील भागांमधील बेरोजगारी म्हणजे दुर्देव - आ. किशोर जोरगेवार

रक्षाबंधन निमित्य  वैद्यनगर येथे स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन, भगीनींनी बांधली आ. जोरगेवार यांना राखी

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  सिएसटीपीएस हे जवळपास 5 हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेची निर्मीती करत रोजगार निर्मितीचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथे विविध कंपण्याही कार्यरत आहे. मात्र येथील सर्व कंपण्यांमध्ये बाहेरील नागरिकांना रोजगारात प्राधान्य दिल्या जात आहे. रोजगाराचे कंेद्र समजल्या जाणा-या सिएटिपीएसच्या मुखा समोर असलेल्या भागातील युवकांच्या नशिबी जर बेरोजगारी असेल तर हे आपले दुर्देव असून या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केेले.

  रक्षाबंधनच्या पवित्र सनाचे औचित्य साधून काल रविवारी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक आनंद इंगळे याच्या वतीने वैद्यनगर येथे स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, विलास वनकर, कौतीक पवार, प्रभाकरराव आश्राम, वसंता भोयर, अशोक बलकी आदिंची मंचावर उपस्थिती होती.
  यावेळी पुढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, मागील दोन वर्षाच्या काळात अनेक विकासाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. यासाठी लागणारा मोठा निधी मला उपलब्ध  करुन देता आला आहे. चंद्रपूर शहरात पाण्याची भिषण समस्या आहे. ती सुटावी यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. याकरीता आपण चंद्रपूर शहर महानगर पालिकेला जवळपास दिड कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र भष्ट्राचाराच्या विळाख्यात सापडलेल्या महानगर पालिकेले अजूनही दिड कोटी रुपयातून होणाऱ्या कामांना मंजूरी दिलेली नाही. जिथ जाउ तिथ खाउ अशी मनपातील सत्ताधारी पदाधिका-यांची भुमीका आहे. या विरोधात चार एक्का दे धक्का हे अभिनव आंदोलन आपण केले. आता परिवर्तणाची गरज असून या भष्ट्राचारी एक्यांना खुर्चीवरुन धक्का देण्यासाठी संघटीत व्हा असे आवाहण त्यांनी केले.
   या भागांमध्ये अजूनही जमीनीचे पट्टे वाटप करण्यात आलेली नाही. खर तर पट्टे देण्याचे काम मनपाचे आहे. मात्र त्यांच्याकडून ते केल्या जात नाही. येथील नागरिकांना पट्टे मिळावे ही आपली भुमीका असून त्यासाठी संबधीत विभागाशी माझा पाठपूरावा सुरु असल्याचेही ते यावेळी म्हणाले. येथील महिलांच्या आरोग्यासाठी  निशुल्क आरोग्य शिबीर आयोजीत करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी यंग चांदा बिग्रेडच्या कार्यकर्त्यांना दिल्यात. यावेळी वैद्यनगरसाठी 25 लक्ष रुपयाचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी आ. किशोर जोरगेवार यांना राखी बांधली. भाऊ म्हणून बहिण्याच्या रक्षणासाठी तिच्या हक्कासाठी सवैद उभा राहिल असे रक्षाबंधन कार्यक्रमानंतर आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. 
        या कार्यक्रमाला आशिष राऊत, भाष्कर बेंद्रे, राम नाईक, मंगल डुमणे, राजेंद्र नन्नावरे, आनंद नन्नावरे, रवींद्र डोमके, विजय बावण, रमेश उंदिरवाडे, अभय नेहारे, नितीन भालेराव, मनोज मर्जे, सुमन चामलाटे, सुशिला रामटेके, मंगला भोयर, सरिता नेहारे, तारा पवार, मनिता साहू, रत्नमाला इलमकर यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.








Post a Comment

0 Comments