यंग चांदा ब्रिगेडच्या मागणीला यश, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील त्रृट्या दुर

 

यंग चांदा ब्रिगेडच्या मागणीला यशशासकीय वैद्यकीय महाविद्यालयरुग्णालयातील त्रृट्या दुर


   चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आरोग्य विषयक अनेक त्रृट्या असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत असून रुग्णांना त्रास सहण करावा लागत आहे. त्यामूळे येथील त्रृट्या दुर करुन उत्तम आरोग्य सेवा देण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती.  सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व निवासी वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकरअल्पसंख्याक विभागाच्या प्रमूख कौसर खानआशा देशमूखसविता दंडारे आदिंची उपस्थिती होती. त्यानंतर येथील त्रृट्या दुर करुन येथील आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे.

    चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयरुग्णालय येथे जिल्हातील नागरिकांसह लगतच्या जिल्हातील नागरिकही उपचार करिता दाखल होतात. मात्र येथील असुविधेमूळे रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.  त्यामूळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयरुग्णालयात येथे उपलब्ध नसलेली डेंग्यू किट उपलब्ध करुन देण्यात यावीसोनोग्राफीचे बंद असलेले दोनही यंत्र दुरुस्त करण्यात यावेयेथे रुग्णसंख्येच्या तुलनेत सलाईन उपलब्ध करुन देण्यात यावीरुग्णांच्या मागणीनूसार औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात यावा तसेच लसीकरण मोहिम सुरळीत करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती. याबाबत त्यांच्या वतीने अधिष्ठाता अविनाश टेकाडे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी भास्कर सोनारकर यांना देण्यात आले होते. त्यांतर यावर कार्यवाही करत सदर त्रृट्या दुर करण्यात आल्या आहे. परिणामी येथील आरोग्य व्यवस्था सुरळीत झाली आहे.









Post a Comment

0 Comments