अस्वलाच्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी

  

अस्वलाच्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी

🔸बल्लारशाह  वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र मानोरा 2 मधील  घटना घडली

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर  तालुक्यातील मानोरा येथे जंगल परिसरात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या 43 वर्षीय महादेव बोबाटे यांचेवर अस्वलीने हल्ला करीत जखमी केले. बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र मानोरा 2 मधील कक्ष क्रमांक 450 मध्ये सदर घटना घडली, या घटनेत बोबाटे हे जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

जखमी बोबाटे यांना वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी तात्काळ 10 हजार रुपयांची मदत वनविभागाद्वारे मिळवून दिली. वन क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असल्याने नागरिकांना जंगल परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.







Post a Comment

0 Comments