मातोश्री वृद्धाश्रम येथे मानवाधिकार सहायता संस्थान-जिल्हा शाखेचा शुभारंभ व ब्लँकेट वितरणाचा कार्यक्रम पार पडला

 

मातोश्री  वृद्धाश्रम येथे मानवाधिकार सहायता संस्थान-जिल्हा शाखेचा शुभारंभ व ब्लँकेट वितरणाचा कार्यक्रम पार पडला

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मानवाधिकार सहायता संस्थान-जिल्हा शाखेचा शुभारंभ उपक्रम म्हणून  दिनांक:15/08/2021रोजी स्वातंत्रदिनी " मातोश्री वृद्धाश्रम"बल्लारपूर रोड येथे वृद्धांना फळे,नाश्ता आणी ब्लँकेट वितरणाचा कार्यक्रम पार पडला.चंद्रपूर शाखेचा हा पहिला उपक्रम असल्याने सर्व पदाधिकारी तथा सदस्य यात सहभागी झाले होते.

महाराष्ट्राचे प्रदेश महासचीव तथा राष्ट्रीय कोर कमेटीचे सदस्य श्री.रवी धारणे यांच्या नेतुत्वात प्रत्येक महिण्यात असा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येईल असा संकल्प उपस्थीत पदाधिका-यांनी घेतला.या उपक्रमात जिल्हाप्रमुख विनायक गरमडे,जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ बदखल,जिल्हा प्रभारी अशोक गर्गेलवार,जिल्हा संरक्षक अशोक पडगेलवार,जिल्हा कार्य.अध्यक्ष अनिल गर्गेलवार,महामंत्री  संतोष क्षिरसागर, महिलाध्यक्षा अनु निलमवार ,चेअरमन सौ.रेश्मा बदखल,कार्याध्यक्षा सौ,हेमलता पोईनकर,महासचिव अरुणा कापटे,सौ.हेमलता धारणे,दमयंती लाटेलवार सह अन्य सदस्य उपस्थीत होते.










Post a Comment

0 Comments