नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने संपूर्ण शहरात डेंग्यू आजाराचे सर्वेक्षण

 

नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने संपूर्ण शहरात डेंग्यू आजाराचे सर्वेक्षण

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : जवळपास मागील 2 वर्षा पासून कोरोना हा जगभरात धुमाकूळ घालत असतांना कोरोनापासून थोडीशी उसंत का होत नाही तोच डेंग्यू आजाराने बल्लारपूर शहरात हात-पाय पसरणे सुरू केले बल्लारपूर शहरात डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे नगर परिषद बल्लारपूर च्या वतीने 13 ऑगस्ट 2021 ला डेंग्यू या दुर्धर रोगाच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना बाबतचे प्रशिक्षण बल्लारपूर शहरातील कलामंदिर परिसरात असलेल्या नाट्यगृहात  घेण्यात येणार आहे तसेच सदर प्रशिक्षणानंतर 14 ऑगस्ट 2021 ते 23 ऑगस्ट 2021 पर्यंत सकाळी 8:00 वा.ते सायंकाळी 6:00 वा पर्यंत प्रत्येक वॉर्ड व प्रभागात जाऊन डास जाळीचे सर्वेक्षण  नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वर्ग, एएनएम, आशा वर्कर व बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या दरम्यान प्रत्येक घरातील पाण्याच्या साठ्याचा सर्वे करण्यात येणार असून डास, अळी असलेले दूषित कंटेनर मध्ये अबेट/टेमिफासचा वापर करून डास अळी नष्ट करण्यात येणार आहे.

        यापूर्वी 16 जुलै पासून बल्लारपूर शहरातील प्रत्येक वॉर्डात आशा वर्करच्या माध्यमातून डेंग्यू या आजारास प्रतिबंध व्हावा यादृष्टीने सर्वे सुरू आहे नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षता बाबत माहिती देण्याचे काम सुरू आहे तसेच बचत गटाच्या माध्यमातून डेंग्यू विषयी जनजागृती करण्याचाही प्रयत्न सुरू आहे बल्लारपूर शहरात डेंग्यू पासून मुक्त राहण्याच्या दृष्टीने  नगर परिषदच्या वतीने 14 ते 23 ऑगस्ट दरम्यान सर्वे करण्यात येणार आहे नागरिकांनी या प्रगणकाला जिथे डास उत्पत्ती होऊ शकेल अशी सर्व भांडी दाखवून त्यात प्रतिबंधात्मक औषध टाकून घ्यावे व आपले पाण्याचे कंटेनर रिकामे करावे तसेच प्रत्येक नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. या सोबतच पाण्याचा ड्रम स्वच्छ धुवून झाकून ठेवावा, फुलदाणी/कुंडी मधील पाणी ७ दिवसांनी बदलावे, भंगार साहित्य टेरेस किंवा छप्पर वर ठेवू नये, निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावावी, झोपतांना मच्छरदाणी चा वापर करावा, टाक्यांना झाकणं बसवावे जेणेकरून डास निर्माण होणार नाही या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन मा.हरीश शर्मा, अध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर, मा. विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांनी केले आहे.





                                             

Post a Comment

0 Comments