बल्लारपूर पेपर मिल ते विसापूर रस्त्यावरील झुडपी जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले बंदोबस्त करा

 

बल्लारपूर पेपर मिल ते विसापूर रस्त्यावरील झुडपी जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले  बंदोबस्त करा

बल्लारपूर-विसापूर-नांदगाव रस्त्यावरील झुडपी जंगल वाढल्यामुळे हिंस्त्र प्राण्यांचा कामगार व प्रवास करणाऱ्यांना धोका

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर या गावातील असंख्य कामगार बल्लारपूर पेपर मिल मध्ये काम करतात.या कामगारांना बल्लारपूर ते विसापूर रस्त्यावरून दररोज रात्री-बेरात्री प्रवास करावा लागतो. या रस्त्यावरील झुडपी जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर होताना दिसत आहे. या हिंस्त्र प्राण्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या कामगारांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. काल परवाच एका कामगाराचा जीव हिंस्र प्राण्यापासून थोडक्यात बचावला.

 रस्त्यावर झुडपी जंगल आल्यामुळे पेपर मिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांना रात्रीच्या प्रवासात प्रवास करणे कठीण झाले आहे. तरी सदर रस्त्याच्या बाजूचे झुडपी जंगलाचा तात्काळ बंदोबस्त करावा व रस्ता मोकळा करावा याकरिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी केली.

   जर वरील मागणी तात्काळ पूर्ण झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी द्वारा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. प्रशासनाकडे मागणी करताना वंचित चे नेते राजू झोडे,सचिन पावडे, संपत कोरडे,प्रदीप झामरे, स्वप्निल सोनटक्के, प्रथम दुपारे, भोजेद्र दुबे,सिद्धांत पुणेकर तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments