बस च्या धडकेने 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

 

बस च्या धडकेने 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

राजुरा शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरातील घटना 

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या जुन्या बस स्थानकाजवळील बँक ऑफ़ इंडिया समोर बस च्या धडकेने 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातून जाणार्‍या राज्य महामार्गावर नेहमीच वर्दळ असते. लगतच असलेले नगरपालिका कार्यालय, बँक ऑफ़ इंडिया, मध्यवर्ती सहकारी बँक, नगरपालिका व्यापारी संकुल व हाकेच्या अंतरावर असलेले उपजिल्हा रुग्णालय, जि प शाळा तसेच वन विभागाचे कार्यालय त्याचप्रमाणे तहसील कार्यालय ह्याच मार्गावर आहे. त्यामुळे हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असतो. 

आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास चालक निलेश झाडे हा बस क्रमांक MH 13 CV 6338 ने बस स्थानकावर जात असताना बँक ऑफ़ इंडिया च्या समोर मागुन येणार्‍या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने मागे बसलेल्या मृतक राहुल रेकलवार ह्याचा बसच्या मागच्या बाजुला धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. तरीही त्याने उठण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे संतुलन बिघडल्याने तो खाली पडला. 

उपस्थित लोकांनी त्याला तात्काळ हाकेच्या अंतरावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असुन बस चालक निलेश झाडे ह्याला अटक केली आहे.






Post a Comment

0 Comments