हरविलेली दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश : 3 दिवसापूर्वी हरविली होती दुचाकी

 

हरविलेली दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश : 3 दिवसापूर्वी हरविली होती दुचाकी

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील भगतसिंग वॉर्ड येथील रहिवासी असलेले प्रविण बावणे, वय-29 वर्ष हे मंगळवारला सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास आपल्या वैयक्तिक कार्यासाठी गांधी चौक परिसरात आले असता आपले काम आटोपून परत जायला निघाले असता त्यांना आपली दुचाकी नियत ठिकाणी पार्क केली असली तरी परत जाताना दिसली नाही शोधाशोध करूनही दुचाकी सापडत नसल्याने याची माहिती त्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनला दिली असता बल्लारपूर पोलिसांनी तपासचक्र फिरविली असता त्यांना सदर दुचाकी क्र MH-34 BE-4906 ही गाडी बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या पार्कींग लगतच्या परिसरात आज शुक्रवारला सकाळी 10:00 वाजता सुमारास आढळून आली बल्लारपूर गांधी चौक परिसरात पार्क केलेली दुचाकी ही रेल्वे स्थानक परिसरात गेली कशी? विशेष बाब म्हणजे सदर दुचाकीची चाबी ही गाडी मालकाकडे होती अज्ञात व्यक्ती कडून सदर दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बल्लारपूर पोलिसांनी तपासचक्र फिरविल्यामुळे दुचाकी सापडली व संबंधित व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आली सदर कारवाई उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलिसांनी केली आहे.







Post a Comment

0 Comments