चंद्रपुर सत्र न्यायालयाने सुनावली 13 वर्षाची शिक्षा व 5000/- रु दंडाची शिक्षा

चंद्रपुर सत्र न्यायालयाने सुनावली 13 वर्षाची शिक्षा व 5000/- रु दंडाची शिक्षा 

  ◾विविध कलमानव्ये दाखल झाले होते गुन्हे

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारशाह पोलीस स्टेशन अंतर्गत अप.क्र 778/2018 कलम 367,377 भांदवी सह कलम 3(A), 4,5,(L)(M) 6 पोक्सो केस नंबर 69/18 अंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपीला 13 वर्षाची शिक्षा व 5000/- रु दंडाची शिक्षा बल्लारशाह सत्र न्यायालयाने सुनावली आहे. या विषयीच्या अधिक माहितीनुसार बल्लारपूर येथील संतोषी माता वॉर्ड विश्वशांती चौक परिसरात वास्तव्यास असलेले फिर्यादी सौ.मिनाक्षी दिपक बागेसर यांनी बल्लारशाह पोलीस स्टेशनला अशी तक्रार दिली की या घटनेतील आरोपी नामे विवेक खुशाल रंगारी वय-30 वर्ष रा.संतोषी माता वार्ड बल्लारपूर याने पीडितेचा( फिर्यादी ) चा 9 वर्षीय मुलगा याचे दिनांक 09 जुलै 2018 ते 15 जुलै 2018 दरम्यान अपहरण करून वारंवार अनेसर्गीक कृत्य करून लैंगिक अत्याचार केला अशा प्रकारची तक्रार दिनांक 15 जुलै 2018 ला पोलीस स्टेशन बल्लारपूर ला दाखल केली या घटनेचा सखोल तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि स्वप्नील निराळे व हेड कॉन्स्टेबल विनोद बावणे, भगवान मेश्राम यांनी करून न्यायालयात केस दाखल केली या अनुषणगाने मा. न्यायालयाने दिनांक 26 ऑगस्ट 2021 ला निकाल देतांना सदर गुन्ह्यातील आरोपीला कलम 367 भांदवि मध्ये 3 वर्ष शिक्षा व 2000 रु दंड व दंड न भरल्यास 1 महिना शिक्षा तसेच सह कलम 6 पोक्सो ऍक्ट अंतर्गत 10 वर्ष शिक्षा व 3000/- रु दंड व दंड न भरल्यास आणखी 3 महिन्याची शिक्षा मा.दीक्षित साहेब अति सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांच्या न्यायालयाने सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील श्री. देवेंद्र महाजन . 










Post a Comment

0 Comments