बल्लारपूरात पुन्हा चालली तलवार 1 गंभीर जखमी 3 ही आरोपींना अटक, दुसऱ्या एका घटनेत नालीत पडून एकाचा मृत्यू



बल्लारपूरात  पुन्हा चालली तलवार 1 गंभीर जखमी 3 ही आरोपींना अटक

 ◾दुसऱ्या एका घटनेत नालीत पडून एकाचा मृत्यू 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात आज पुन्हा एकदा तलवार चालली असल्याचे प्रकरण घडले आहे तर दुसऱ्या एका घटनेत 1 इसम नालीत पडून मृत्यू झाला असल्याची नोंदही बल्लारपूर पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे सूत्राच्या माहितीनुसार बल्लारपूर शहरातील पंडित दीनदयाल वार्डात या दोन्ही घटना घडल्या आहेत पोलीस सूत्रानुसार 3 व्यक्तींनी ( अजय झांझोटे, शिवशंभू झांझोटे व राहुल बिल्डक्ट ) या तिघांनी राहुल डंगोरे या व्यक्तीवर तलवारीने हल्ला केल्याची माहिती आहे.


 या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर रेफर करण्यात आले असून या प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून 3 ही आरोपींना अटक केली आहे.

 तर दुसऱ्या एका घटनेत पंडित दिनदयाल वार्डातील रहिवासी असलेले सतीश राजू नगराळे वय 24 वर्ष, यांचा आज दुपारी 3:30 वाजता नालीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सूत्राच्या माहितीनुसार सदर व्यक्तीने मद्यप्राशन केला असल्यामुळे नालीत पडला असावा व यामुळेच मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे सदर व्यक्तीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असता सदर व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासणी केल्यानंतर त्यास मृत घोषित केले सदर घटनेचा तपास चंद्रकांत चंदे मेजर करीत आहे. तर तलवार प्रकरणातील माहितीनुसार बाचाबाचीतून सदर गुन्हा घडला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमीझ  मुलाणी करीत आहे.









Post a Comment

0 Comments