बल्लारशाह रेल्वे सुरक्षा बल RPF च्या पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू



बल्लारशाह रेल्वे सुरक्षा बल  RPF  च्या पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू 

 ◾घातपात की हत्या चौकशीची मागणी

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर)  : बल्लारशाह रेल्वे जक्शन नागपूर विभागातील महत्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून परिचित आहे शिवाय बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, दक्षिण रेल्वे अशा तीन झोनचे कार्यक्षेत्र आहे अशा परिस्थितीत बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना म्हणून टप्याटप्यावर सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहे मात्र बल्लारशाह रेल्वे स्थानकातील तेलंगाना राज्य च्या एक चौकी बल्लारशाह आहे. साउथ  आरपीएफ पोलीस कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज मंगळवार 13 जुलै ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सूत्राच्या माहितीनुसार चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला सूत्राच्या माहितीनुसार अनिल गणपत मडावी वय -29 वर्ष, असे मृत व्यक्तीचे नाव असून मृतकाच्या कुटुंबीयांनी सदर घटनेची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

          विरुर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या चोरीच्या आरोपाखाली आरोपी अनिल  गणपत मडावी यांना अटक करण्यात आली होती सदर आरोपीला अटक करून सोमवारला आरपीएफ पोलीस चौकीत आणण्यात आले होते मात्र त्याच्या हाताला दुखापत असल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 10:00 च्या सुमारास या आरोपीचा मृत्यू झाला. दिवसभर मात्र या घटनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली मात्र आज मंगळवार ला दुपारच्या सुमारास या घटनेची माहिती बाहेर आली घटनेचं नेमकं कारण काय? सदर घटना नेमकी हत्या की घातपात अशा प्रकारच्या विविध चर्चाना उधाण आले असतांना मृतकांच्या कुटुंबीयांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.



Post a Comment

0 Comments