एका इसमावर रॉडने हल्ला, घुग्घुस शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ
◾शिवीगाळ करून लोखंडी रॉड ने डोक्यावर वार
◾दारू सुरू होतास मागील दोन दिवसात घुग्घुस येथील अमराई वार्डात एकापाठोपाठ तीन जबर मारहाणीच्या घटना
घुग्घुस(राज्य रिपोर्टर) :घुग्घुस हरातील अरविंद बापूजी उरकुडे (40) रा. अमराई वार्ड, घुग्घुस यानी आपल्या कुटुबसह साथीदाराला घेऊन फिर्यादी गौरीशंकर ग्यानीराम वाढाई (38) रा. अमराई वार्ड, घुग्घुस यास जुन्या वादातून शिवीगाळ करून लोखंडी रॉड ने डोक्यावर वार केला.
त्यामुळे फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली तक्रारी वरून कलम 324,504,506 (34) गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी गौरीशंकर वाढाई यास पोलिसांनी घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तिथे वृत्तसंकलना साठी घुग्घुस येथील पत्रकार गेले तिथे मोबाईलने चित्रीकरण करने सुरु केले असता घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस उमाकांत गौरकार यांनी पत्रकारास चित्रीकरण करण्यास मनाई केली व पत्रकाराशी बाचाबाची केली.
विशेष बाब म्हणजे घुग्घुस येथील काही राजकीय नेते हे पोलीस स्टेशन समोर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित होते ते नेमके कोणत्या उद्देशाने तिथे उपस्थित होते,
शहरात दारू सुरू होतास मागील दोन दिवसात घुग्घुस येथील अमराई वार्डात एकापाठोपाठ तीन जबर मारहाणीच्या घटना घडल्या त्यामुळे अमराई वार्डातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमराई येथील महिला फिर्यादी कविता सरोदे यांना येथीलच आरोपी सुरज पाझारे यांनी दोन वेळा जबर मारहाण केली फिर्यादीच्या तक्रारी वरून कलम 324,504,506 गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी हल्ला करून फरार झाला आहे. ही घटना घडून एक दिवस लोटत नाही तोच येथील आरोपी अरविंद उरकुडे यांनी, जुन्या वादातुन फिर्यादी गौरीशंकर वाढाई यास लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.
सध्या घुग्घुस शहरात दारू,गांजा विक्रीमुळे गुन्ह्यांची वाढ होत असून घुग्घुस पोलिसांच्या निष्काळजी पणा मुळे कायदा व सुव्यवस्था पूर्णतः बिघडलेला आहे.
0 Comments