विसापूर येथील सांडपाण्याच्या समस्येचे वंचित चे नेते राजू झोडे यांनी केली पाहणी, लवकरच या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन.

 

विसापूर येथील सांडपाण्याच्या समस्येचे वंचित चे नेते राजू झोडे यांनी केली पाहणी, लवकरच या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन.

बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : विसापूर गावात मागील कित्येक वर्षापासून वार्ड क्रमांक 1 मधील आदिवासी पूरबुडी भागातील सांडपाण्याची समस्या आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांचे जीव धोक्यात आले आहे अनेकदा तेथील नागरिक आजारी पडले आहे. 

सांडपाण्यामुळे साचलेले दूषित पाणी जनावरे अनेकदा पीत असतात. नागरिकांसोबत जनावरांच्या सुद्धा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. आज दि. 5  जुलैल वंचित बहुजन आघाडीचे नेते मा.राजूभाऊ झोडे यांनी सांडपाण्याची पाहणी केली व तात्काळ सांडपाण्याचे समस्यांचे निवारण करून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी असे निर्देश ग्रामपंचायत विसापूर चे सरपंच वर्षा कुडमेथे उपसरपंच अनकेश्वर मेश्राम यांना दिले. लवकरच प्रशासनामार्फत युद्धपातळीवर काम चालू करण्यात येईल असे सरपंच ,उपसरपंच यांच्यामार्फत सांगण्यात आले, पाहणी करत असताना विसापूर ग्रामपंचायत चे सदस्य रीना कांबळे ,गजानन पाटणकर ,प्रदीप गेडाम ,सुनील रोंगे ,दिलदार जयकर तसेच  वंचित बहुजन आघाडीचे चे कार्यकर्ते सिद्धांत पुणेकर ,स्वप्निल सोनटक्के ,रमेश लिंगमपल्लीवार ,प्रथम दुपारे, सचिन ठीपे ,ललित टोंगे ,सचिन कोरासे ,शुभम जगताप, नीरज झोडे ,मधुकर आत्राम ,लखन टवर ,आशिष पाझारे ,अन्य कार्यकर्ते  व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments