महाराष्ट्राचे विकासपुरुष आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बल्लारपूरात भक्ती सप्ताहास सुरुवात

 

महाराष्ट्राचे विकासपुरुष आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बल्लारपूरात भक्ती सप्ताहास सुरुवात


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील व विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकाच्या ह्रदयात आपले स्थान निर्माण करणारे व ज्यांच्या उपस्थितीने प्रत्येकाला आधार वाटणारे इतकेच नव्हे तर आपल्या मंत्री पदाच्या काळात आपलं शहर विधानसभा क्षेत्रच नव्हे तर जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास करणारे महाराष्ट्राचे विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे माजी वित्त, वन व नियोजन मंत्री ज्यांनी स्वपक्षातच नव्हे तर विरोधी पक्षातही मानाचे स्थान प्राप्त केले असे आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बल्लारपूर शहरात धार्मिक स्वरूपात भक्ती सप्ताहाला सुरुवात झाली आहे या माध्यमातून समाजातील तळागाळातील जनसामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न राहील या निमित्ताने ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धार्मिक सप्ताहास सुरुवात करताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री .चंदनसिह चंदेल यांच्या शुभ हस्ते वस्ती विभागातील जागृत असलेले श्री 108  राधाकृष्ण मंदिर येथे पूजा अर्चना करण्यात आली व या निमित्ताने सॅनिटाईजर मशीनचे लोकार्पण तथा उपस्थित असलेल्या बाल गोपालांना ' सुधीरभाऊ चे दूत ' टी-शर्ट, मॉस्क व प्रसादाचे वितरण करण्यात आले.
 कोरोना संक्रमणाच्या काळात सुरुवातीला आपल्या मतदारसंघातच नव्हे तर संबंध राज्यात शक्य होईल त्याप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न केला व याच उदात्त हेतूने बल्लारपूर शहरातील विविध कार्यक्रमात श्री . चंदनसिह चंदेल, नगराध्यक्ष श्री . हरीश शर्मा, श्री . काशी सिंह   व  पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धार्मिक व सेवा सप्ताहाचे आयोजन बल्लारपूर शहरात करण्यात आले आहे या अंतर्गत सुधीरभाऊ च्या दीर्घ आयुष्यासाठी बल्लारपूर शहरातील अनेक मंदिर, बौद्ध विहार, चर्च, मस्जिद याठिकाणी प्रार्थना करण्यात येणार आहे तसेच समाजातील दुबळा घटकांना सेवांच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येणार आहे तसेच कोरोनाकाळात आपलं सर्वस्व पणाला लावून जनसामान्य नागरिकांची सेवा केली अशा कोरोना योद्धे यांच्या कार्याचाही गौरव करण्यात येणार आहे या अंतर्गत संपूर्ण आठवडा भर अनेक कार्यक्रम पार पडणार आहे याकरिता श्री शिवचंद द्विवेदी, मनीष पांडे, सतीश कणकम, हरिबाबू लंका, हनुमान सिह ठाकूर, मुन्ना श्रीवास, पवन द्विवेदी इ चे अमूल्य सहकार्य लाभले.







Post a Comment

0 Comments