सर्वसामान्यांच्या हाकेला धाऊन जाणारा नेता म्हणजेआमदार किशोर जोरगेवार : श्रीमती वंदनाताई हातगावकर

 

सर्वसामान्यांच्या हाकेला धाऊन जाणारा नेता म्हणजेआमदार किशोर जोरगेवार :  श्रीमती वंदनाताई हातगावकर

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शनिवारला मुल येथे यंग चांदा ब्रिगेड चंद्रपुर च्या माध्यमातून शेकडो महिलांचा स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून यंग चांदा ब्रिगेडच्या प्रमुख महिला संघटीका श्रीमती वंदनाताई हातगावकर  उपस्थीत होत्या. चंद्रपुरचे लोकप्रीय अपक्ष आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन यंग चांदा ब्रिगेड ही संघटना चंद्रपूर मधील सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी व त्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. यंग चांदा ब्रिगेड समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करीत आहे. शहराच्या मध्यभागी फुटपाथवर बसुन पारंपारीक साधारण व्यवसाय करणाऱ्या एका गरीब आईचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानभवनात चंद्रपुर येथील सामान्य लोकांच्या हितासाठी लढ्तो आहे. स्थानिक लोकांच्या रोजगाराच्या प्रश्नासाठी तसेच कामगारांच्या न्यायिक हक्कासाठी विविध जनआंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. कोविड - 19 काळात  प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन रुग्णांना सर्वोपरी मदत करण्याचं कार्य यंग चांदा ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी सामाजिक जवाबदारी म्हणून पार पाडली आहे. असे प्रतिपादन श्रीमती वंदनाताई हातगावकर यांनी केले. अनेक सेवाभावी कार्यक्रमाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेड कार्यरत आहे. आरोग्याच्या क्षेत्रांत सुद्धा ज्या लोकाना गंभीर स्वरुपाचे आजार असतील त्यांना मुंबईपर्यंत उपचाराकरिता  सर्वोतोपरी मदत करण्याच कार्य या संघटनेच्या माध्यामतून होते. मुल हे धान उत्पादक क्षेत्र आहे . तसेच इथे बेरोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थीत आहे तसेच यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून मुल येथे संघटन स्थापन करुन संघटनेच्या माध्यमातून पुढील काळात सर्व प्रकारचे सेवा कार्य करण्याचा आमचा मानस आहे असे सुद्धा वंदनाताईनी सांगितले. या स्नेहंमिलन कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या नेत्या श्रीमती आशाताई देशमुख, भाग्यश्री हांडे, श्रीमती वैशालीताई रामटेके, श्रीमती सविताताई दंडारे, श्रीमती विमलताई काटकर तसेच मुल येथील सौ स्वातीताई गोविंदवार, सौ रागिणीताई आडपवार, श्रीमती मेघाताई खंडाळे, सौ साधनाताई नामेवार, सौ सुनंदाताई शिंगाडे, सौ सुरपाम, सौ महाडोळे, सौ चन्नावार यासह शेकडो महिला उपस्थीत होत्या.





Post a Comment

0 Comments