सावखेडासिम येथे वाळु वाहतुकीच्या कारणांवरून पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबास एका गटाकडुन मारहाण पोलीसात गुन्हा दाखल आरोपी ताब्यात...!

सावखेडासिम येथे वाळु वाहतुकीच्या कारणांवरून पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबास एका गटाकडुन मारहाण पोलीसात गुन्हा दाखल आरोपी ताब्यात...! 

जळगाव/चोपडा(राज्य रिपोर्टर) :   तालुक्यातील सावखेडा सिम येथील पोलीस पाटील यांच्या घरात घुसुन वाळु वाहतुक करणाऱ्यांच्या एका गटाने पोलीस पाटील यांच्या घरात घुसुन त्यांच्या कुटुंबातील मंडळीला लाकडी दांडाने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असुन, पोलीसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सावखेडा सिम तालुका यावल येथील पोलीस पाटील पंकज जिवन बडगुजर हे आपल्या कुटुंबासोबत जेवण करीत असतांना गावातील प्रकाश सुभाष पाटील , दिलीप सुभाष पाटील , विकास पंडीत पाटील , विजय विकास पाटील , चेतन विकास पाटील यांनी त्यांच्या घरात अनधिकृत प्रवेश करून तु आमचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडयाला लावतो असे बोलुन तु पोलीस कसा राहतो असे बोलुन व शिवीगाळ करीत संशयीत आरोपी यांनी पोलीस पाटील यांना खाटेच्या दांडाने मारहाण केली या वेळेस माझ्या भाऊची पत्नी पुनम जिवन बडगुजर व भाऊ जिवन दयाराम बडगुजर , राहुल जिवन बडगुजर यांना ही लाकडी दांडयाने मारहाण करून दुखापत केली . याबाबत पोलीस पाटील पंकज जिवन बडगुजर वय३५ वर्ष राहणार सावखेडा सिम यांनी यावल पोलीसात फिर्याद दाखल केल्या असुन भाग ५ गु.र.न.११६ / २०२१ भादवी कलम१४३ , १४७ , १४९ , ४५२ , ३२३ , ३२४ , ५०४ , ५०६ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .


Post a Comment

0 Comments