एकाच रात्री चार ठिकाणी चोऱ्यानी केला हात साफ, हजारोंचा मुद्देमाल केला लंपास

 

एकाच रात्री चार ठिकाणी  चोऱ्यानी केला हात साफ, हजारोंचा मुद्देमाल केला लंपास

⚫वेकोली वसाहत सिस्टर काॅलनीची घटना

घुग्घुस ( राज्य रिपोर्टर)घुग्घुस शहरात एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या करून हजारोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली आहे. घुग्घुस शहरात सध्या चोरी तसेच घरफोड्यांच्या गुन्ह्यात वाढ होत आहे.अशातच घुग्घुस येथील रामनगर वार्ड क्रमांक ५ वेकोली वसाहतीत गुरुवारच्या रात्री चंद्रशेखर चौधरी, शोभा भोयर,प्रोमिल मंडल,जंगा ओडलु यांच्या घरात घुसून चोरी केली.तसेच रोख रकमेसह चौदा हजारांचा मुद्देमाल लंपास केला. 

दरम्यान आज शुक्रवारी सकाळी चोरीची हि बाब लक्षात येताच नागरिकांनी याची माहिती घुग्घुस पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.घुग्घुस शहरात चोरी तसेच घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांनी रात्रीच्या वेळेस परिसरात गस्त घालावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.







Post a Comment

0 Comments