चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे डास प्रतिबंधक औषधाची फवारणी
डासांची पैदास रोखण्यासाठी कूलरच्या टाक्यांमध्ये 'अबेट द्रावण'
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : पावसाळ्यानंतर डेंग्यूचा प्रभाव वाढतो पावसाळ्यात आणि त्याच्या नंतरच्या महिन्यात म्हणजेच जुलै ते ऑक्टोबरमध्ये डेंग्यू सगळ्यात जास्त पसरतो. कारण या ऋतूमध्ये डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते. डेंग्यू तापावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच डेंग्यू आणि मलेरिया आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांच्या घरी असलेल्या कूलरच्या टाक्यांमध्ये 'अबेट द्रावण' टाकण्यात येत आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पावसाळा लागताच डास प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत औषध फवारणी तसेच कुलर्सच्या पाण्याच्या टाकीत अबेट द्रावण टाकण्यात येत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाबूपेठ प्रभाग क्रमांक १३ मध्ये किरणे प्लॉट, लक्ष्मीनारायण लॉन परिसर, तुकूम प्रभाग क्र. १, आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक १७मध्ये विक्तूबाबा मंदिर, जयश्रीराम मंदिर, माता मंदिर चौक, तुकडोजी नगर आदी ठिकाणी डास प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत औषध फवारणी करण्यात आली. एमइएल प्रभागातील संजय नगर, दर्गा वार्ड परिसरातील माता मंदिर, शिव मंदिर परिसरात धुराळणी करण्यात आली. तुकुम तलाव येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळताच रुग्णांच्या घरी व आजूबाजूचे परिसरात कीटकनाशक औषधी ची फवारणी करण्यात आली. एमएसइबी कॉलनी परिसर, विवेक नगर, विठ्ठल मंदिर प्रभागात फवारणी व अबेट द्रावण टाकण्यात आले. झोन क्र. १ (ब) मध्ये आणि झोन क्र. 3 (ब) अंतर्गत प्रकाश नगर येथील भागात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली. पठाणपुरा गेट आणि विठोबा खिडकी परीसर सफाई करण्यात आली.
पावसाळ्यानंतर डेंग्यूचा प्रभाव वाढतो पावसाळ्यात आणि त्याच्या नंतरच्या महिन्यात म्हणजेच जुलै ते ऑक्टोबरमध्ये डेंग्यू सगळ्यात जास्त पसरतो. कारण या ऋतूमध्ये डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते. एडीस इजिप्ती डासाला खूप उंचावर उडता येत नाही आणि डेंग्यूचा मच्छर सकाळी चावतो. चावल्याच्या ३ ते ५ दिवसांनंतर रुग्णांमध्ये डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. शरीरात ही बाधा होण्यासाठी मर्यादा ३ ते १० दिवसांची पण असू शकते. त्यामुळे आतापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
पावसाळ्याच्या दिवसात या गोष्टींवर लक्ष ठेवा
- डेंग्यूचे मच्छर साचलेल्या पाण्यात होतात. म्हणुन घरात आणि आजुबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका.
- कूलरमध्ये असलेले पाणी २ ते ३ दिवसांमध्ये नक्की बदला.
- घराच्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये एंटी लार्वाचा फवारा मारा.
- घरात लादी पुसणाऱ्या पाण्यात केरोसिन किंवा फिनायल टाकून लादी पुसा.
- जेव्हा घरातून निघाल, तेव्हा पुर्ण बाह्यांचे कपडे घाला, शॉर्ट्स घालण्याचे टाळा.
- मच्छर गडद रंगाकडे आकर्षित होतात म्हणून फिकट रंगाचे कपडे घाला.
- गडद सुगंधाचे फर्म्यूम टाळा, कारण मच्छर स्ट्रॉन्ग स्मेलकडे आकर्षित होतात
- झोपण्याच्या आधी हात-पाय आणि शरिराच्या उघड्या अंगावर व्हिक्स लावा. त्यामुळे मच्छर जवळ येणार नाहीत
- तुळशीचे तेल, पुदिन्याच्या पानांचा रस, लसणाचा रस किंवा झेंडूच्या फुलांचा रस शरीरावर लावल्याने मच्छर तुमच्यापासून लांब राहतील
0 Comments