बल्लारशाह शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गोंडकालीन किल्ल्याचा उत्तर पूर्व दिशेला असलेल्या बुरुजाचा भाग कोसळला

बल्लारशाह शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गोंडकालीन किल्ल्याचा उत्तर पूर्व दिशेला असलेल्या बुरुजाचा भाग कोसळला 

 ◾अन ऐतिहासिक किल्याच्या बुरुजाचा भाग कोसळला

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्हा व बल्लारपूर शहरात मागील 2 दिवसापासून कोसळत असलेला मुसळधार पाऊस यामुळे बल्लारशाह शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गोंडकालीन किल्ल्याचा उत्तर पूर्व दिशेला असलेल्या बुरुजाचा भाग कोसळला असल्याची घटना घडली संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 10:30 ते 11:00 वाजताच्या दरम्यान पुरातन असलेल्या गोविंदबाबा मंदिर कडून असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचे बुरुज असलेला भाग रात्रीच्या दरम्यान कोसळला असून यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या लगत वास्तव्यास असलेले श्री दादाजी पाटील यांचे वाल कंपाऊंड मात्र या बुरुजाच्या खचण्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच या मार्गाने जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे.

         विशेष बाब बल्लारशाह येथील ऐतिहासिक असलेला गोंडकालीन वैभव असलेला किल्ला हा फार प्राचीन असून या किल्ल्यावरील बुरुजाला व संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणावरून तडा गेल्या आहेत निकट भविष्यात कोणतीही मोठी जीवित वा वित्त हानी होण्यापूर्वी भारतीय पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासनाने लगेच लक्ष दिले पाहिजे तसेच या घटनेमुळे ज्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांची नुकसानभरपाई ची मागणी जनसामान्य नागरिकांनी केली आहे.





Post a Comment

0 Comments