चोपडा शहर पोलीस स्टेशन आवारातील बेवारस वाहनांचा खुला जाहीर लिलाव

 

चोपडा शहर पोलीस स्टेशन आवारातील बेवारस वाहनांचा खुला जाहीर लिलाव

जळगाव/चोपडा (राज्य रिपोर्टर) :   येथील शहर पोलीस स्टेशन आवारातील बेवारस वाहनांचा खुला जाहीर लिलाव ठेवण्यात आला असल्याची माहीती पो.नी. अवतारसिंग चव्हाण यांनी दिली आहे. शहर पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस स्थितीत मिळून आलेल्या मोटार सायकली बऱ्याच वर्षां पासून पो.स्टे.आवारात पडून आहेत.यातील काही मूळ मालकांना त्यांची वाहने कायदेशीर बाबी पूर्ण करून परत करण्यात आली असून अजूनही ५९ वाहने शिल्लक आहेत.

या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करून जाहीर खुला लिलाव करण्याची अनुमती मिळाली असून,प्रादेशिक परिवहन विभाग यांनी ठरवून दिलेल्या किमती प्रमाणे लिलावाची बोली लावता येणार आहे.

दिनांक १५ रोजी सकाळी १० वा.चोपडा शहर पोलीस स्टेशन आवारात लिलावाला सुरुवात होणार असून परवाना धारक भंगार विक्रेते यात सहभागी होऊ शकतात असे आवाहन चोपडा शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments