आता सिम कार्ड प्रमाणे वीज कँपनी ही बदलण्याचा पर्याय मिळणार ! वीज सुधारणा विधेयक संसदेत पारित होणार

 

आता सिम कार्ड प्रमाणे वीज कँपनी ही बदलण्याचा पर्याय मिळणार ! वीज सुधारणा विधेयक संसदेत पारित होणार

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : केंद्रीय मंत्रिमंडळ येत्या काही दिवसांत विद्युत ( संशोधन ) विधेयक 2021 ( Electricity Amendment Bill, 2021 ) मंजूर करण्याचा विचार करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर सिम कार्ड कंपन्यांप्रमाणे वीज कंपनी बदलण्याचा पर्याय नागरिकांना मिळणार असून सदरचे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी पावसाळी अधिवेशन संपणार आहे. दूरसंचार सेवांप्रमाणेच वीज ग्राहकांनाही अनेक सेवा पुरवठादारांमध्ये त्यांच्या आवडीचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. वीज ( दुरुस्ती ) विधेयक 2021 पुढील काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आणि मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल.

नवीन 17 विधेयकांपैकी वीज ( दुरुस्ती ) विधेयक देखील 12 जुलै 2021 रोजी जारी झालेल्या लोकसभेच्या बुलेटिन नुसार विद्यमान संसदेच्या अधिवेशनात सरकारने प्रस्तावित केलेल्या या विधेयकात वीज ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्येसुद्धा ठरविण्यात आलीत.

वितरण व्यवसायामधून परवाना रद्द केला जाणार

वीज कायद्यात प्रस्तावित केलेल्या दुरुस्तींसह वितरण व्यवसायावरून परवाने रद्द केले जातील आणि त्यामध्ये स्पर्धा होईल. यासह प्रत्येक आयोगात कायदेशीर पार्श्वभूमीचा सदस्य नियुक्त करणे आवश्यक असेल. याशिवाय विद्युत अपीलीय न्यायाधिकरण ( APTEL ) ला बळकट करण्याची तसेच नूतनीकरण योग्य खरेदी वचनबद्धता ( RPO ) पूर्ण न करण्यासाठी दंड करण्याची तरतूदही राहणार आहे.

आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने (CCEA ) वीज वितरण कंपन्यांसाठी ( Discoms ) 3.03 लाख कोटी रुपयांच्या पंचवार्षिक सुधार – आधारित योजनेस मान्यता दिली. चालू आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने निकालावर आधारित सुधारणांशी जोडलेली वीज वितरण योजना जाहीर केली होती. कोविड – 19 साथीच्या दुसर्‍या लहरीनंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेजचा भाग म्हणून ही योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केली. रिफॉर्म्स आउटकम लिंक्ड पॉवर डिस्ट्रीब्यूशन योजनेंतर्गत पायाभूत सुविधा, सिस्टम अपग्रेडेशन, क्षमता वाढवणे आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी डिस्कॉम्सना आर्थिक मदत दिली जाईल.







Post a Comment

0 Comments