जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणावे : पोलीस अधिक्षकांकडे मागणी - आम आदमी पार्टी

 

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणावे : पोलीस अधिक्षकांकडे मागणी - आम आदमी पार्टी

बल्लारपूर (राज्य रिपोर्टर)  : जिल्ह्यातील बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, राजुरा, घुग्घुस शहरात गुन्हेगारीमध्ये सद्यस्थितीत प्रचंड वाढ झालेली आहे. जिकडे तिकडे खेळण्यासारखे बंदुका निघत आहे व गुन्हेगारांमध्ये पोलिस प्रशासनाचा धाक उरलेला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगार आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर संघटित गुन्हेगारी मोकाका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे व जनतेला भयमुक्त करावे तसेच मुख्य शहरातील सीसीटीव्ही सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ सुरू करून वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालावा जेणेकरून सामान्य नागरिकांचा बळी जाणार नाही.

वरील बाबीचे निवेदन चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांना देण्यात आले. निवेदन देतांना सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, मयुर राईकवार माजी जिल्हाध्यक्ष, तसेच संस्थापक सदस्य हिमायु अली, पदाधिकारी संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, सूर्यकांत चांदेकर जिल्हा सहसचिव इत्यादी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments