बल्लारपूर पेपरमिल द्वारे कोविड वैक्सीनेशन कॅम्प : नागपुरातील किंग्सवे रुग्णालया द्वारे करण्यात येईल वैक्सीनेशन

 

बल्लारपूर पेपरमिल द्वारे कोविड वैक्सीनेशन कॅम्प : नागपुरातील किंग्सवे रुग्णालया द्वारे करण्यात येईल वैक्सीनेशन

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर)  : बल्लारपूर शहरातील बिल्ट पेपर उद्योग द्वारे या कम्पनीचे कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे कोविड वैक्सीनेशन कॅम्प चे उदघाटन  माजी खासदार व कामगार नेते मा.नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते करण्यात आले भारतातील प्रसिध्द उद्योग असलेल्या बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड (बिल्ट) द्वारे समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य व्यक्त करीत कोरोना संक्रमण काळात आपले कामगार व त्यांचे कुटुंबीय सुरक्षित रहावे या उदात्त हेतूने बल्लारपूर पेपरमिल चे कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी वैक्सीनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे सदर कॅम्प नागपुरातील प्रसिध्द किंग्सवे रुग्णालयाच्या सहकार्यातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिल्ट बल्लारपूर च्या मानव संसाधन विभागाचे महाप्रबंधक श्री. प्रवीण शांकेर यांच्या माहितीनुसार वैक्सीनेशन चा पहिला टप्पा 3 व 4 जुलै ला आयोजित करण्यात आला यानुसार 1000 लोकांचे वैक्सीनेशन करण्यात येईल तसेच समोर सुध्दा वैक्सीनेशन सुरू राहील.

        यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी खासदार श्री. नरेशबाबू पुगलिया यांनी आवाहन केले की कोणत्याही भूलथापा व अफवा कडे लक्ष न देता सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या जबाबदारी चे पालन म्हणून कोरोना चे लसीकरण करून घ्यावे तसेच कोरोना संक्रमणामुळे ज्या कामगाराचा जीव गेला अशा लोकांच्या कुटुंबियाला आर्थिक मदत करण्याची मागणी बिल्ट प्रबंधनाकडे केली आहे यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बिल्टच्या विद्युत विभागाचे महाप्रबंधक श्री. गिरीराज निमा, श्री. रजत शिनाय, गजानन गावंडे, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, बल्लारपूर पेपरमिल मजदूर सभेचे तारासिंग कलशी, वसंत मांढरे, रामदास वागदरकर, कृष्णन नायर, वीरेंद्र आर्य, सुभाष माथनकर, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, आशिष मेहता, राजेंद्र शुक्ला, सुदर्शन पुल्ली, के.व्ही.रेड्डी, गजेंद्र सिह, विनोद महतो, सुनील बकाली, सुनील बावणे, मो.फरीद, संतोष आत्राम, अनुपसिंग संधू, भारत गोमासे, तेजिंदर सिंग इ ची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानव संसाधन विभागाचे उपमहाप्रबंधक अजय दुगरकर, डॉ.रुपाली यादव, श्रीमती सुचिता ठावरी, रुपेश शिवणकर, सुनील बोन्तुलवार, फिरोज आलम, विद्या भगत, अतुल शेंडे, रितेश बोरकर, अजय साळवे इ चे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments