संजय सोनवणे यांची भारतीय पत्रकार महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी निवड...!

  

संजय सोनवणे यांची भारतीय पत्रकार महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी निवड...! 

जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) :   तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी तथा दैनिक लोकमत चे पत्रकार संजय सोनवणे यांची भारतीय पत्रकार महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या झालेल्या नियुक्तीमुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय पत्रकार महासंघ नोंदणीकृत अधिकृत राष्ट्रीय संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांच्या आदेशावरून जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष पत्रकार नंदलाल मराठे,जिल्हा सरचिटणीस,पत्रकार संजीव शिरसाठ यांनी संजय सोनवणे यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.त्यांच्या या झालेल्या नियुक्तीमुळे  संस्थापक अध्यक्ष नवलसिग राजपुत,केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील,केंद्रीय उपाध्यक्ष,राकेश कोल्हे,जयवंत देवरे(दिल्ली),प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी(धुळे),प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार जैन,केंद्रीय सचिव प्रकाश कासार,जिल्हा उपाध्यक्ष विश्राम तेले,जिल्हा कार्याध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी,प्रविण कोळी,तालुका अध्यक्ष(शहर)गणेश बेहेरे,ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र चौधरी,तालुका कार्यकारी अध्यक्ष सुनील पाटील,तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र कोळी,कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील,तुषार सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.




Post a Comment

0 Comments