अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लावून धरलेल्या मागणीला मोठे यश आता प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लावून धरलेल्या मागणीला मोठे यश आता प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल

गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थी परिषदेने केला होता विद्यापीठाकडे पाठपुरावा

 चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) :  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे गेल्या 2012 पासून कार्यरत आहे. दुर्गम व जनजाती क्षेत्रात असलेले हे विद्यापीठ या भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याकरता स्थापन झाले होते. पण विद्यापीठाची रचना व सुरुवातीला धोरणात्मक न घेतलेले निर्णय यामुळे विद्यापीठाचा व सोबतच विद्यार्थ्यांचा विकासात आडकाठी येत होते पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या दहा वर्षापासून विविध गोष्टींचा पाठपुरावा, संघर्ष,आंदोलन, निवेदने या माध्यमातून विद्यापीठाकडे अनेक विद्यार्थी हितेशी निर्णय हे अखिल भारतीय  विद्यार्थी परिषदने करवून घेतले. याचाच एक भाग म्हणून 2018- 19 पासून गोंडवाना विद्यापीठ येथील प्रत्येक महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल हे स्थापन करावे व विद्यार्थ्यांना नोकरी करिता, व्यवसायाकरिता व त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता या सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावे अशी मागणी केली होती याचा पाठपुरावा विद्यार्थी परिषदेने वेळोवेळी केला प्रसंगी आंदोलन, निवेदने, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन याचा पाठपुरावा करत होते त्याच मागणीला धरून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ने 3 जुलै 2019 ला या बाबतचे परिपत्रक जाहीर केले व विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांना येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल बद्दलची संपूर्ण माहिती व अहवाल विद्यापीठाकडे पाठवायला सूचना करण्यात आलेला आहे या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खूप खूप अभिनंदन व स्वागत करते व सहकार्याची हमी देते याबद्दल अभाविपचे चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले गडचिरोली जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर ब्रह्मपुरी जिल्हा संयोजक प्रवीण गिरडकर यांनी अभिनंदन केले व संपूर्ण महाविद्यालयांनी याबद्दल योग्य ती पावले उचलावीत असे आवाहन सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे.


Post a Comment

1 Comments

  1. ""abhinandam sir khup changl karya kel bhavi aani garuju mulana yacha fayda hoil

    ReplyDelete