श्रीमती वैशाली सोनटक्के यांना समाजकार्य विषयात पीएच.डी.प्रदान..!

 

श्रीमती वैशाली सोनटक्के यांना समाजकार्य विषयात पीएच.डी.प्रदान..! 

जळगाव/चोपडा (राज्य रिपोर्टर) :  चोपडा येथिल श्रीमती वैशाली सोनटक्के यांनी "एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या कार्याचा व समस्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास " (विशेष संदर्भ: जळगांव व धुळे जिल्हा) या विषयावर संशोधन केले.त्यांना भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथिल प्रा.डाॅ.विष्णू रामदास गुंजाळ यांनी मार्गदर्शन  केले . त्यांनी आपला संशोधन प्रबंध कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव यांना सादर केला होता. त्त्यामुळे त्यांना विद्यापीठाने दि.27/05/2021 रोजी  समाजकार्य विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. श्रीमती वैशाली दयाराम सोनटक्के या प्राचार्य डाॅ.ईश्वर सौंदाणकर यांच्या सुविद्य पत्नी आहेत.श्रीमती .वैशाली सोनटक्के यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments