लाच लुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई..! रावेर सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकास अडीच हजार रुपयांची लाच भोवली...!

लाच लुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई..! 

रावेर सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकास अडीच हजार रुपयांची लाच भोवली...!

ग्रॅज्युएटीची रक्कम बॅंक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात सुटले लालच ...!

जळगाव / चोरडा ( राज्य रिपोर्टर ) : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम बॅंक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात अडीच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकास लाच लुचपत विभागाचे जाळ्यात अडकत कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सार्वजनीक बांधकाम कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज, वय-30, रा.मदिना कॉलनी, रावेर ता-रावेर जि.जळगाव. वर्ग-३. यांनी  तक्रारदार यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग,रावेर येथुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहे. त्याच्या ग्रॅज्युएटीची 3,91,710/-₹ रु. त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात 2000/- रू.व अर्जीत रजेची येणारी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी 500/-रु. असे एकुण 2,500/- रु. लाचेची मागणी  तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष केली होती त्याआधारे हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.आणि कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी श्री.सतीश डी.भामरे, पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.यांच्या मार्गदर्शनाखाली PI. संजोग बच्छाव,PIलोधी,सफौ.दिनेशसिंग पाटील,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पोकाॅ.महेश सोमवंशी.   यांनी केली    त्यांना   श्री.सुनील कडासन ,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,नाशिक.श्री. निलेश सोनवणे , अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक श्री. सतीश डी.भामरे , पोलीस उप अधीक्षक, वाचक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले.




Post a Comment

0 Comments