महिला काँग्रेस ने राबवले महागाई च्या विरोधात स्वाक्षरी अभियान
स्वाक्षरी अभियानाला लाभला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी कडून महागाईच्या विरोधात १२ ते १७ जुलै पर्यंत स्वाक्षरी अभियान राबवण्याचे आदेश महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी दिले त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस चंद्रपूर च्या वतीने हे अभियान शहरात राबवण्यात आले.
या अभियानाची सुरवात १२ जुलै ला जिल्हापरिषद समोरील पेट्रोल पंपा वरून करण्यात आली त्यानंतर जनता कॉलेज पेट्रोल पंप, वरोरा नाका चौक या ठिकाणी हे अभियान राबवण्यात आले आज शेवटल्या दिवशी हे अभियान हे अभियान जेटपूरा गेट ते गोल बाजार या ठिकाणी राबवण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान शहरात राबवण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस च्या पदाधिकारी नी नागरिकांशी चर्चा करून त्यांची स्वाक्षरी महागाई विरोधात फार्म वर घेतली. या स्वाक्षऱ्या घेतांना लोकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून आला, त्यामुळे येणारे दिवस हे मोदी सरकार साठी कठीण असून या पुढे देखील महिला काँग्रेस प्रचंड जनआंदोलन या मुद्द्यावर करणार आहेत. जनतेचा हा रोष केंद्र सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हजार पेक्षा अधिक लोकांशी सरळ संवाद साधत त्यांच्या स्वाक्षऱ्या महिला काँग्रेस ने घेतल्या अशी माहिती महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी यावेळी दिली.
या अभियानात महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता धोटे, शहर ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, कार्यकरणी सदस्य लता बारापात्रे, मुन्नी मुमताज शेख यांनी सक्रिय सहभाग घेतला.
0 Comments