शासनाने दिलेल्या पैशावर जर जनतेची कामे होत नसतील तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही...!

 


शासनाने दिलेल्या पैशावर जर जनतेची कामे होत नसतील तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही...!

🔹पालकमंत्र्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर...! 

 🔹चोपडा येथे आढावा बैठकीत जनहिताच्या विविध प्रश्नांवर चर्चा.

   जळगांव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : शासनाने दिलेल्या पैशावर जर जनतेची कामे होत नसतील तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे खडे बोल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीत नगर पालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुडे यांना सुनावले.

     ३० रोजी दुपारी ३ वाजता  नवीन प्रशासकीय इमारतीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी नागरपालिकेचे मंजूर कामे दोनदोन वर्षे होत नसतील तर असला हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असे सांगत मुख्याधिकारी अविनाश गांगुडे यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचे आदेश दिलेत.  यावेळी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात साठ हजार खावटी अनुदान मंजूर करण्यात आले त्यापैकी चोपडा तालुक्यात सर्वात जास्त दहा हजार तीनशे प्रकरणे मंजूर करण्यात येऊन प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये रोख टाकण्यात येणार आहे  तर दोन हजार रुपयांचे विविध खाद्य पदार्थ देण्यात येणार आहेत यावेळी खाद्य पदार्थ काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्याचे आले. तसेच  यावेळी अनेक गावातील ग्रामस्थांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या त्यांना योग्य तो न्याय देण्याच्या आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत.

     यावेळी प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी एस कोसोदे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे , मुख्याधिकारी अविनाश गंगोर्डे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासुरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक मनोज पाटील, महावितरणचे उपविभागीय अभियंता एन. एस. रासकर , एस. एम. गायकवाड, निम्न तापी प्रकल्पाचे अभियंता रजनी देशमुख, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, ग्रामीणचे सहायक पोलीस  निरीक्षक संदीप आराक, अडावदचे सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणेश पाटील, शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख रोहिनीताई पाटील, उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, चोपडा तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, यावल तालुका प्रमुख रवी सोनवणे, महिला तालुका प्रमुख मंगलाताई पाटील, शहर प्रमुख नरेश महाजन, शहर प्रमुख आबा देशमुख, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, पंचायत समिती सदस्य एम. व्ही. पाटील, शिवसेनेचे गटनेते महेंद्र धनगर, नगरसेवक राजाराम पाटील, भैया पवार, किशोर चौधरी, प्रकाश राजपूत,  नगरसेविका संध्या महाजन, लासुर सरपंच जनाबाई महाजन, विधानसभा तालुका संघटक सुकलाल कोळी, नामदेव पाटील, प्रताप पाटील, पी. आर. माळी, नंदू पाटील, मंगल इंगळे, दिपक चौधरी, गोपाल चौधरी, गणेश पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, धीरज पाटील, देविदास सोनवणे, हातेड सरपंच ज्ञानेश्वर अहिरे, प्रताप पावरा, अमोल सांगोरे  आदींसह सर्व विभागाचे अधिकारी , पदाधिकारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments