हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात एक वैमानिक ठार, महिला पायलट जखमी

 

हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात एक वैमानिक ठार

महिला पायलट जखमी

चोपडा तालुक्यातील वर्डीपासून जवळच असलेल्या रानतलाव परिसरात आज दुपारी हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात एक वैमानिक ठार झाला असून महिला पायलट जखमी झाल्याचे वृत्त आहे.


जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) :  सविस्तर माहिती असे की, वर्डी गावापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रानतलाव या परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हेलीकॉप्टर कोसळले. येथून जवळच शेतात काम करणाऱ्यांना मोठा आवाज ऐकल्याने याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता वैमानिक मृत झाल्याचे दिसून आले. तर महिला पायलट जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात आणले जात आहे. दरम्यान, हेलीकॉप्टर अपघाताची माहिती समोर येताच तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गंभीर जखमी झालेल्या महिला वैमानिकाला उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments