चंद्रपुरातील चातुर्मास साठी संथारा प्रेरिका सत्यसाधनाजी म.सा. आदि ठाणे ७ चे प्रवेश

 

चंद्रपुरातील चातुर्मास साठी संथारा प्रेरिका सत्यसाधनाजी म.सा. आदि ठाणे ७ चे प्रवेश

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : श्रमणसंघीय जैन दिवाकर मालनसिहनी कमलावतीजी म.सा. चे सुशीष्य  उपप्रवर्तीनी संथारा प्रेरिका सत्यसाधनाजी म.सा. साध्वी अर्हंत ज्योती जी म.सा. साध्वी तन्मय दर्शनजी म.सा. साध्वी हितसाधनाजी म.सा. साध्वी हर्षप्रज्ञाजी म.सा. साध्वी गुरुचायाजी म.सा. साध्वी सोम्य ज्योतिजी म.सा. आदि ठाणा ७ हे ऐतिहासिक चातुर्मास संपल्यानंतर ३०० किलोमीटर पायी चालत जामनेर येथून पायी चालत चंद्रपूर शहरात चातुर्मास करण्यासाठी आले.

श्री नागिनकुमारजी पुगलिया यांच्या निवासस्थानी भक्तांबर स्तोत्राचा जाप करून, चंद्रपूर येथील जैन मंदिर, सराफा लाइन, येथे जैन बांधवानी वेलकमच्या घोषणेसह, जैन मंदिरात प्रवेश झाला. यावेळी जैन बांधवाचे मंगलाचरणनीं स्वागत केले. तन्मय दर्शनाजींनी म.सा. पाठ केले. चार महिने - धर्म ज्ञान करावयाचे आहे. अशी साध्वी अहर्त ज्योतिजी म.सा. तो म्हणाले. अपप्रवर्तीनी संथाराप्रेरीका सत्यसाधनाजी म.सा. यांनी चंद्रपुरातील लोकांना धार्मिक उपासना, तपश्चर्या, जप करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. संत बनून कर्म-श्रय करण्यास सांगितले. निगेटिव्ह उर्जा घरात पंच तीर्थंकरांचा जप केल्याने बाहेर निघेल. म्हणूनच रोज जपाचे आयोजन केले गेले आहे.

या शुभ चातुर्मास प्रवेशाच्यावेळी जामनेर, सोयेगाव, धुलिया, नाशिक, भद्रावती, हिंगणघाट, वडखी येथून श्रावक आले! कार्यक्रमानंतर गौतम प्रसादी जैन श्रावक संघाकडून ठेवण्यात आले होते. यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष निर्दोश पुगलिया, अमित बैद, राजेश डागा, अशोक बोथरा, जितेंद्र चोरडिया, जितेंद्र जोगड, रवींद्र बैद, आदी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments