बिरसा फायटर्स पदाधिकारीने वाचविला मुलीचा जीव...!

बिरसा फायटर्स पदाधिकारीने वाचविला मुलीचा जीव...! 

 जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर )  :मध्यप्रदेश मधील रतलाम येथे एका गरीब आदिवासी लहान मुलीस  हाॅस्पीटलमध्ये उपचार करताना रक्ताची अत्यंत आवश्यकता होती.ही गोष्ट गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार बिरसा फायटर्स तथा मुळ गणोर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांना समजली.त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता त्या गरीब मुलीच्या उपचारासाठी रतलाम येथील हाॅस्पीटलमध्ये जाऊन रक्तदान केले.गणेश खर्डे यांनी दिलेल्या रक्तामुळे त्या गरीब मुलीचे जीव वाचण्यास मदत झाली आहे. 

    रक्तदान हे जीवनदान म्हटले जाते.त्याची प्रचिती आज एका प्रसंगातून लोकांना पाहायला मिळाली आहे.याच आठवड्यात शिरपूर जिल्हा धुळे  येथील बिरसा फायटर्स टिमने 27 जणांनी लोकमत समूहसोबत लौकी येथील शासकीय आश्रमशाळेत सार्वजनिक रक्तदान केले होते. त्याचे सर्वत्र कौतुक  होत असतानाच पुन्हा एका बिरसा फायटर्स पदाधिकारीने रक्तदान  करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गणेश खर्डे यांनी रक्तदान करून लहान मुलीचे जीव वाचवल्याबद्धल त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे. 

       बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा,मनोज पावरा राज्याध्यक्ष,राजेश धुर्वे उपाध्यक्ष, राजेंद्र पाडवी महासचिव,केशव पवार  महानिरीक्षक,दादाजी बागूल कोषाध्यक्ष,नंदलाल पाडवी कार्याध्यक्ष,रोहित पावरा प्रवक्ता,विलास पावरा नाशिक विभाग अध्यक्ष , वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे ,जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष धुळे,सतीश जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष,मनोज कामडी जिल्हाध्यक्ष पालघर,आकाश पवार बागलाण अध्यक्ष,शरद जाधव मालेगाव अध्यक्ष इत्यादी बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी गणेश खर्डे यांच्या या रक्तदानाच्या कामाचे कौतुक केले आहे.



Post a Comment

0 Comments