१० लाख ५० हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करून ३ आरोपीना अटक तिघांची नशा उतरवत पोलीस निरीक्षक 'हिरे' यांची धडाकेबाज कारवाई जिल्हाात कौतुक होत आहे...

 

१० लाख ५० हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करून ३ आरोपीना अटक 

 तिघांची नशा उतरवत पोलीस निरीक्षक 'हिरे' यांची धडाकेबाज कारवाई जिल्हाात कौतुक होत आहे... 

कासोदा येथील पंचायत समिती सदस्याच्या पतीसह एरंडोल येथील तिघांना केली अटक...! 


जळगाव/चोपडा (राज्य रिपोर्टर) :   कार मधून ४० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या कासोदा येथील पंचायत समिती सदस्याच्या पतीसह एरंडोल येथील तिघांची पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी नशा उतरवत मुसक्या आवळल्या. धरणगाव ते सावखेडा रस्त्यावर सोमवारी रात्री ही कारवाई केली. दरम्यान गेल्या वर्षभरापूर्वी देखील धरणगावहून गांजा आणताना दोघांना अटक केली होती. परंतु तत्कालिक पोलिस निरीक्षक अ मोरे यांनी योग्य तपासाकडे दुर्लक्ष केल्याने गांज फोफावली आहे. त्याला पोलिस निरीक्षक हिरे या लावल्याने ते आता हिरो ठरले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या टीममध्ये एपीआय राकेश परदेशी, हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , हेडकॉन्स्टेबल मिलिंद भामरे , हेडकॉन्स्टेबल मधुकर पाटील यांना सोबत घेऊन १२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सावखेडा शिवारात सापळा रचला. यावेळी ते चोपडा धरणगाव रस्त्यावर गुलाबराव कदम यांच्या हॉटेल इंद्रायणी जवळ दुचाकीने (क्रमांक एम एच १९ बी सी ५७३०) येणाऱ्या व्यक्तींची हालचाल संशयित वाटली. त्याला लगेच ताब्यात घेतले त्याने त्याचे नाव सतीश बापू चौधरी असे सांगितले. त्याचा मोबाईल जप्त करून घेतला. त्यानंतर थोड्या वेळाने पावणे अकरा वाजता मागाहून कार (क्रमांक एम एच ०१, बीटी ५०९) आली. तिला अडवून तपासणी केली असता त्यात ३९ किलो ५०० ग्राम असे २० पाकिटे गांजा डिक्कीत आढळून आला. गाडी चालक आकाश रमेश इंगळे (रा मरीमाता नगर एरंडोल) व त्याच्या सोबत कासोदा येथील इस्लाम पुरा भागातील शकिल खान अय्युब खान या दोघांना ताब्यात घेतले. तत्काळ पंच मागवून केला पंचनामा कोणताही दबाव येऊ नये म्हणून कारवाई करताच पोलीस निरीक्षक हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्याशी संपर्क साधून शासकीय पंच मागवून पंचनामा केला. गांजाची किंमत ६ लाख असून ,४ लाखाची चारचाकी व ५० हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करून तिघा आरोपीना अटक करण्यात आली आहे. मिलिंद भामरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

दरम्यान, संशयित शकिल खान अय्युब खान हे कसोद्याच्या पंचायत समिती सदस्यांचे पती असून त्या सदस्या आघाडी सरकारच्या पक्षामधील असल्याचे समजते. गेल्या वर्षभरातील देखील धरणगावहुन गांजा आणताना दोघांना अटक गेल्या वर्षभरापूर्वी देखील धरणगावहून गांजा आणताना दोघांना अटक केली होती. त्यात मुख्य आरोपी कसोद्याचा असल्याचे उघडकीस येऊनही तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी पुढील तपास केला नव्हता. त्यामुळे मूळ आरोपी पकडला नव्हता. काही पोलिसांनी हित साधले होते. अशी चर्चा होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी देखील केली आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सातत्याने धडक कारवाया केल्याने गुन्हेगारीवर वचक बसला आहे. सामान्य नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.




Post a Comment

0 Comments