राजीव गांधी उद्यान येथे वाॅकीग ट्रैकचा लोकार्पण

 

राजीव  गांधी उद्यान येथे वाॅकीग ट्रैकचा लोकार्पण

  चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज दि .१४/०७/२०२१ ला सकाळी ८:१५ वा मनपा चंद्रपूर चे  पठाणपुरा भिवापूर प्रभाग १४ मधल्या राजीव गांधी उद्यान येथील वॉकिंग ट्रॅक चे लोकार्पण करण्यात आले. माजी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष नंदू नागरकर तसेच नगरसेवक प्रभाग १२ यांच्या मार्गदर्शनाखाली हा लोकार्पण सोहळा घेण्यात आले, भिवापूर प्रभाग १४ च्या नगरसेविका सौ. खुशबू चौधरी नगरसेविका सौ. मंगला आखरे तसेच प्रभाग ८ च्या नगरसेविका सौ. सुनीता लोढिया व परिसरातील जेष्ठ नागरिकांचा हस्ते लोकार्पण सोहळा पार पडलें या प्रसंगी जेष्ठ नागरिक सुरेंद्र पाटील, श्रीराम चहारे, प्रभाकर चहारे, वसंत चहारे, रमेश भुते, वासुदेव भुते, रामदास बानकर मसराम गुरुजी व त्यांची संपूर्ण योग टीम, श्याम धोपट, अजय वैरागडे, रवींद्र चहारे, अंकुश चौधरी, जितेंद्र विराणी आणि नरेश रेभनकर सोबत आझाद गार्डन ची संपूर्ण टीम, सचिन चहारे, राकेश  चहारे, शोभा वाघामारे मनपा व्यायाम शाळा चंद्रपूर ची संपूर्ण टीम, काळाराम क्रीडा मंडळ ची संपूर्ण टीम व परिसरातील मुले, युवा, जेष्ठ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments