निलगाई (रोई ) व वनराणडुकरांने उधवस्त केलेल्या पिकांची नुकसानाची भरपाई द्या - उपसरपंच अनील गोंडे यांची मागणी

 

निलगाई (रोई ) व वनराणडुकरांने उधवस्त केलेल्या पिकांची  नुकसानाची भरपाई द्या - उपसरपंच अनील गोंडे यांची मागणी

निलगाई व रानडुकरांचे बंदोबस्त करा 

वनमंत्री तथा वनविभागाला पत्र

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  हवामान बदलामुळे आधीच पिकांना फटका बसला असतानाच निलगाई (रोई )व रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. निलगाई (रोई) व रानडुकरांच्या कळपांनी तालुक्यातील अनेक गावांतील  पीकांचे  उद्ध्वस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. निलगाई  रोई व डुकरांचे कळप शेतात घुसून संपूर्ण पीक भूईसपाट केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.निलगाईचे (रोई)व  रानडुकरांचे कळप भरदिवसा शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांवरही अचानक हल्ले करीत आहेत. त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनराई व वनभाग व भूभाग व अल्पसिंचन क्षेत्र असलेल्या जेवरा ,तुळसी ,तांबाडी ,हेटी,कोरपणा  येथील शेतकरी हंगामात  मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. हा परिसर वनराई  असल्यामुळे निलगाई (रोई) व रानडुकरांची संख्या मोठी आहे. सध्या हरणांपेक्षा  निलगाई  (रोई) व रानडुक्करांची संख्या वेगाने वाढत आहे. वन भुभागामुळे लपण्यासाठी जागाही असल्याने रानडुकरांसाठी पोषक वातावरण आहे. दिवसभर दृष्टीस न पडणारी निलगाई( रोई )व रानडुकरे रात्रीच्या वेळी कळपाने बाहेर पडतात. त्यामुळे उभे असलेले पीक आडवे होऊन नुकसान होते. शेतकऱ्यांनी जीवापाड कष्ट करून आणलेले शेतकर्यांचे पीक निलगाई (रोई) व  रानडुकरांमुळे भुईसपाट होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वन भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी हंगामात अनेक प्रकारच्या  पिकांचे निलगाई (रोई)व रानडुकरांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी रात्रभर जागावे लागत आहे. काही शेतकरी रात्रभर विविध आवाज काढणारे संगीत लावतात, तर काही शेतकरी फटाके फोडून या रानडुक्करांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरी देखील शेतकऱ्यांना निलगाई (रोई) व रानडुकरांचा त्रास सहन करावा लागत आहे. 

मागील दोन वर्षापासुन निलगाई वनरानडुकर यांनी केलेली शेतकर्यांची नुकसाना भरपाई अजुनही शेकर्यांना मिळाली नाही, वारंवार वनविभाग वनसडी येथे माहिती विचारण्यास गेले असता तेथील कर्मचारी उडवाउडविचे उत्तरे देऊन वेळ काढुण घेतात शेतकर्यांची झालेली नुकसान भरपाईचा न्याय मागायचा कुणाल हे मात्र गुलदस्यातच आहे  

पिकांच्या नुकसानीबरोबरच ही निलगाई (रोई)व रानडुकरे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांवर हल्ले करीत आहेत. गेल्या दोन वर्षांत परिसरातील अनेक शेतकऱ्यांवर निलगाईच्या करपात व  रानडुकरांनी हल्ले करुन जखमी केले आहे. , जेवरा  येथील  सुमारे मागील दोन वर्षाअगोदर एका  शेतकऱ्यांवर निलगाइ मुळे जिव गमवावा लागला परंतु अजुन पर्यंत शासनाने कोणतेही मदत दिली नाही, अनेक शेतकर्यांना  रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी केले आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निलगाई रोई व रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी तथा जेवरा ग्राम पंचायत चे उपसरपंच अनील गोंडे यांनी केली आहे .

निलगाई (रोई) रानडुकरांनी  पिकांचे मोठे नुकसान केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी  रानडुकरांनी  एका शेतकरी बांधवावर  हल्ला केला होता. मात्र, जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी वन विभागाकडून एकदम तुटपुंजी मदत मिळत नाही . मात्र, कागदपत्रे गोळा करण्यातच शेतकऱ्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. वन विभागाने निलगाई (रोई )रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनील गोंडे यांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments