कोळी नोंदनुसार समाजाला एस्.टी.चा दाखला मिळाला पाहिजे...!
तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांची आग्रही मागणी.
चोपडा (राज्य रिपोर्टर ) : चोपडा तालुका विधानसभा मतदारसंघात आदिवासीबहुल लोकसंख्या जास्त असल्याने हा मतदारसंघ अनु.जमातीसाठी राखीव करण्यात आलेला आहे.तालुक्यात आदिवासींच्या लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या व मतदारसंख्या एकट्या कोळी समाजाची आहे.म्हणुनच हा मतदारसंघ सन २००९ पासून राखीव करण्यात आलेला आहे.त्यानुसार ह्या मतदारसंघातील कोळी समाजाला फक्त कोळी नोंदनुसार अनु.जमाती(एस्.टी.)चा दाखला मिळाला पाहिजे,अशी आग्रही मागणी चोपडा म.वाल्मिकी कोळी समाजमंडळाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
तालुक्यातील इतर आदिवासींप्रमाणेच कोळी समाजाला सुध्दा आदिवासींच्या सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे.आजही कोळी समाजाच्या जातप्रमाणपत्राचा प्रश्न ज्वलंत आहे.फक्त कोळी नोंद असलेल्या दोन चार पुराव्यांवरच कोळी समाजाला अनु. जमाती (एस्.टी./टोकरेकोळी) चा दाखला मिळाला पाहिजे. तरच हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे,असे समजण्यात येईल. अन्यथा ज्यांच्यामुळे हा मतदारसंघ राखीव झाला तोच कोळीसमाज आपल्या न्याय व हक्कांपासुन वंचित राहत असेल तर हा एकप्रकारे त्या समाजावर अन्यायच आहे.मग हा मतदारसंघ अनु.जमातीसाठी राखीव का करण्यात आला ? असाही खडा सवाल कोळीसमाज मंडळाचे जगन्नाथ बाविस्कर(गोरगांवले बु.)यांनी ह्या पत्रकान्वये उपस्थित केला आहे.
0 Comments