चंद्रपूर शहराच्या लोकसंख्येनुसार वाढीव लसींचा साठा द्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 चंद्रपूर शहराच्या लोकसंख्येनुसार वाढीव लसींचा साठा द्या 

महापौर राखी संजय कंचर्लावार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर)  : शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी मनपा सुरुवातीपासून प्रयत्नशील आहे. शहरात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण केली. त्यामुळे नागरिक जास्तीत जास्त संख्येने पुढे येत आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी मनपा हद्दीतील लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसा लसीचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली. 

सोमवारी (ता. ५) महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे आणि नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली. यावेळी महापौरांनी शहरात होत असलेल्या लसीकरणाची गोषवारा सांगितला. सोबतच शहरात होत असलेल्या लसीच्या पुरवठ्यात वाढ करून देण्याची मागणी सुद्धा केली.

चंद्रपूर शहरात सुमारे २० केंद्र नियोजित असून, लसींच्या उपलब्धतेनुसार केंद्र सुरु केली जातात. शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या आसपास आहे. लसीकरणासाठी पात्र व्यक्तींची संख्याही मोठी आहे. मनपा हद्दीत आजपर्यंत ६७ हजार ९०२ व्यक्तींना कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली. यातील २५ हजार १४९ व्यक्तींनी दुसरीदेखील लस घेतली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन तो टाळण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. त्यासाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी महापौरांनी केली.

Post a Comment

0 Comments