अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनाने आर्थिक सहाय्य करावे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनाने आर्थिक सहाय्य करावे.

वंचित बहुजन आघाडीचे युवानेते स्वप्निल सोनटक्के  यांनी तहसिलदारामार्फत जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री,व मुख्यमंत्री  यांना  मागणी  केली.

 बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्यात सतत  सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे, नागरिकांच्या घरांचे, अन्नधान्यांचे, मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, या सर्व नुकसानीचे पंचनामे करून आपद्ग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी विसापूरचे युवा नेता स्वप्निल सोनटक्के यांनी तहसिलदारामार्फत जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री,व मुख्यमंत्री यांना केली.

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो घरांची पडझड झाली तर हजारो हेक्‍टरवरील पिके पुराच्या पाण्याखाली आली. अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात एकूण 9040 मिमी पावसाची नोंद झाली. बल्लारपूर तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली,  शहरात भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, ऐतिहासिक किल्ल्यांची काही भाग कोसळला. विसापूर गावात भिंत कोसळून एक महिला जखमी झाली. हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली आली त्यात नजीकचे गाव असलेले विसापूर, नांदगाव, आरवट, चारवट, दहेली या गावातील शेतीना मोठ्या प्रमाणात फटका बसला. राजुरा तालुक्यातील अनेक मार्ग पुरामुळे बंद झाले. मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली. जिवती तालुक्यात अनेक गावांमध्ये सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेलंगणातील पुराच्या महाराष्ट्रातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला, ब्रह्मपुरी तालुक्यातील गोसीखुर्द धरणाचे 31 दरवाजे उघडल्याने शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली. मुल तालुक्यात सुद्धा अनेक घरांची पडझड झाली व शेतीचे नुकसान झाले. कोरपना तालुक्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले त्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला. मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह असलेले मच्छिमार यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला जिल्ह्यात दोन दिवस सुरू असलेल्या सतत मुसळधार पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून जिल्हा प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करून तात्काळ नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते स्वप्निल सोनटक्के यांनी केली निवेदन देताना प्रथम दुपारे, सिद्धांत पुणेकर, करण कुमले, फारुक शेख, उदय भगत, रामकृष्ण मिलमिले, उत्कर्ष करमनकर, प्रणित चालखुरे व इतर कार्यकर्ते  उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments