क्षत्रिय मराठा संघटनेतर्फे पत्रकार बंधुचा सत्कार...!
जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर) : पारोळा श प्र -येथे क्षत्रिय मराठा संघटने तर्फे कोरोना काळात जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकार बंधू ना संघटने कडून गौरवण्यात आले. सोबत पारोळा शहर व ग्रामीण रुग्णालयात तसेच पोलीस प्रशासन आणि हमाल मापाडी वर्ग तसेच विविध क्षेत्रातील कोरोना योद्धे यांचा सम्मान करण्यात आला..
क्षत्रिय मराठा संघटना तर्फे पारोळा तालुका कोरोना योध्दा सन्मान पत्र व सत्कार करण्यात आला त्यावेळी जिल्हा अध्यक्षतेखाली अभिजीत पाटील प्रमुख वकील समीति चे अँड. भाऊसाहेब पाटील, अभिजीत संपर्क प्रमुख ईश्वर पाटील,हेमंत पाटील,अँड किशोर पाडसेकर,दिनानाथ पाटील,मनोज बोरसे व जिल्हा प्रवक्ते अनिल पाटील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ऍड भाऊसाहेब पाटील यांनी बोलताना सांगितले की संघटनेचे कार्य जिल्हास्तरावर असून यात मुख्य उद्देश समाजासाठी कार्य करणाऱ्या पत्रकार, पोलीस, आरोग्य विभाग अंतर्गत कामे करणाऱ्या मंडळींना प्रोत्साहित करणे असून हां आमचा छोटासा प्रयत्न आहे तर जिल्हा प्रवक्ते अनिल पाटील यांनी यावेळी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब असून वर्ष भर काम करणाऱ्या घटकास मान सन्मान,प्रोत्साहन मिळाले पाहिजे या उदात्त हेतूने संघटनेने पूर्ण जिल्ह्यात तालुका वाईज कार्यक्रम घेत आहे.संघटनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांनी सर्व पारोळा क्षत्रिय मराठा समाजाचे आभार मानले.
0 Comments