बल्लारपूरात गुन्ह्याचे सत्र सुरूच : बीटीएस प्लॉट परिसरात एकाने पत्नीसह सुनेचा खून करण्याचा प्रयत्न : एकाचा मृत्यू

 

बल्लारपूरात गुन्ह्याचे सत्र सुरूच : बीटीएस प्लॉट परिसरात एकाने पत्नीसह सुनेचा खून करण्याचा प्रयत्न : एकाचा मृत्यू

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ): बल्लारपूर शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे असे चित्र निर्माण होत आहे बल्लारपूर शहरातील बिटीएस प्लॉट परिसरात वास्तव्यास असलेल्या या घटनेतील आरोपी काजल डे व्यवसायाने ऑटोचालक यांनी आपली पत्नी आशा डे रा.बिटीएस प्लॉट बल्लारपूर जी कॅन्सर सारख्या विविध आजाराने ग्रस्त होती तिचा व सून प्रियंका रवी डे वय-28 वर्ष या दोघींचाही गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने या घटनेत आशा डे वय-45 वर्ष यांचा घटनास्थळी मृत्यू झाला व सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सून प्रियंका रवी डे वय-28 वर्ष, यांचा जीव वाचला विशेष बाब म्हणजे आरोपीची पत्नी ही मागील 4 वर्षांपासून विविध आजाराने ग्रस्त होती व या आजारपणामुळे की अन्य कोणत्या कारणामुळे सदर घटना घडली हा चौकशीचा भाग आहे मात्र या हत्याकांडा नंतर आरोपीने स्वतः पोलीस स्थानकात दाखल होऊन आपल्या गुन्ह्याची माहिती दिल्याचे वृत्त आहे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना 14 जुलै ला सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान घडली असल्याचे वृत्त आहे दिवसेंदिवस बल्लारपूर शहरात गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे विशेष बाब म्हणजे गुन्हे शहराच्या बाहेर घडतात मात्र आरोपी बल्लारपूर शहरातील निघतो हे चिंतनीय आहे नुकताच 2 दिवसापूर्वी चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणात फिर्यादी व आरोपी दोन्ही बल्लारपूर शहरातील आहे या घटनेची शाई वाळते न वाळते तोच बल्लारपूर शहरातील बिटीएस प्लॉट परिसरात ही घटना घडली व यात एका निरपराध व्यक्तीचा जीव गेला या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.




Post a Comment

0 Comments