महागाईविरोधात चोपडा काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेला उस्फूर्त प्रतिसाद

 

महागाईविरोधात चोपडा काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेला उस्फूर्त प्रतिसाद 

जळगाव/ चोपडा( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नाना पटोले व जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. संदीप सुरेश पाटील यांच्या आदेशान्वये चोपडा शहर आणि तालुक्यात महागाईविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक 16 जुलै 2021 रोजी सायं. पाच वाजता चोपडा शहरातील मन्यारअली भागात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महागाईने त्रस्त झालेले जनता मोदी सरकार विरुद्ध असंतोष व्यक्त करीत आहे. यावेळी चोपडा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. के. डी. चौधरी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्री अजबराव पाटील, चोपडा तालुका सूतगिरणीचे संचालक श्री. राजेंद्र भास्करराव पाटील , रमाकांत सोनवणे ,श्री. गोपीचंद चौधरी, श्री. इलियास पटेल यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.



Post a Comment

0 Comments