बातमीचा इफेक्ट अखेर त्या अधिकार्‍यांनी सोडली गाडी - शासकीय वाहनाचा अवैध वापर प्रकरण

 

बातमीचा इफेक्ट

अखेर त्या अधिकार्‍यांनी सोडली गाडी - शासकीय वाहनाचा अवैध वापर प्रकरण

♦️मुंबई मुख्य कार्यालय अहवालाच्या प्रतिक्षेत - सहकारी अधिकार्‍याला वाचविण्याचा प्रयत्न?

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागीय आगारातील एक अधिकारी स्वतःच्या पदाला शासकीय वाहन वापरण्याची परवानगी नसतानाही शासकीय वाहनाचा अवैध वापर करून महामंडळाचे आर्थिक नुकसान करत असल्याची बातमी माध्यमांनी प्रकाशित करून खळबळ उडवून दिली होती. बातमी प्रकाशित होताच संबंधित अधिकार्‍याचे धाबे दणाणले असुन त्यांनी तात्काळ शासकीय वाहनाचा वापर थांबविला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मात्र तरीही त्या अधिकार्‍यांनी वाहन वापर बंद करणे हे वास्तव की धुळफेक? हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता मागील एक महिन्यापासुन सदर अधिकारी शासकीय वाहनाचा दुरुपयोग करत नसल्याचे आढळून आले आहे.

मात्र ह्या प्रकरणात विभागीय सुरक्षा अधिकार्‍यांनी चौकशी करून गोपनीय अहवाल मुंबई येथिल मुख्य कार्यालयास सादर करणे बंधनकारक असुनही सुरक्षा अधिकार्‍यांनी संबंधित अहवाल आजपर्यंत मुंबई कार्यालयाला पाठविला का? हे अनुत्तरीत आहे.

काही काळ चंद्रपूर विभागीय आगारात स्थायी विभागीय नियंत्रक नव्हते मात्र जवळपास 20 दिवसांपूर्वी स्मिता सूतवने ह्यांनी विभागीय नियंत्रक म्हणुन कार्यभार स्विकारला असुन त्या अत्यंत कर्तव्यकठोर असल्याची चर्चा आहे. सदर प्रकरण आधीचे असल्यामुळे विभागीय नियंत्रकांना सदर प्रकरणाची माहिती नसावी मात्र कामगार अधिकारी राकेश तळमळे ह्यांनी, ही माहिती विभागीय नियंत्रकांना देणे अपेक्षित आणि गरजेचे असुन कामगार अधिकारी ह्यांनी देखिल सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल तयार करून विभागीय नियंत्रकांना सादर करणे बंधनकारक आहे मात्र कामगार अधिकारी राकेश तळमळे ह्यांनी आपले कर्तव्य पुर्ण केले की ते आपल्या सहकारी अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी अहवाल सादर करण्यास मुद्दाम विलंब करत आहेत का? हा प्रश्न कायम आहे.

तरीही आतातरी विभागीय नियंत्रक ह्या प्रकरणात लक्ष घालुन त्या अधिकाऱ्यांचा अहवाल मुंबई मुख्य कार्यालयाला पाठवतात का व त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते हे बघणे महत्वाचे आहे. 







Post a Comment

0 Comments